Headlines

शहरात आज भक्ती अन् उत्साहाचा गजर ज्येष्ठागौरींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी:माहेरवाशिणीचे आगमन; पारंपरिक विधी अन् समृद्ध संस्कृतीचे घडणार दर्शन‎



शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या वातावरणात माहेरवाशिणीसारख्या येणाऱ्या ज्येष्ठागौरीच्या (महालक्ष्मी) स्वागताची तयारी अत्यंत उत्साहात सुरू आहे. आज गुरुवारी ज्येष्ठागौरीचे आवाहन होत असून त्यासाठी सायंकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंतचा मुहूर्त आहे. त्यानंतर

.

ज्येष्ठागौरी पूजेसाठी लागणारे साहित्य मुखवटे : पितळ, तांबे, चांदी किंवा शाडूच्या मातीचे पारंपरिक मुखवटे. काही ठिकाणी उभ्या गौरी (स्टँड किंवा कोथळ्यांवर साडी नेसवून) किंवा धान्याच्या राशीवर मुखवटे स्थापन केले जातात. वस्त्रालंकार: पैठणी किंवा नऊवारी सिल्क साडी, खण, चोळी आणि पारंपरिक दागिने (हार, नथ, तान्‍सुली, बांगड्या). पूजेचे साहित्य: हळद, कुंकू, गंध, अक्षता, गुलाल, अबीर, विड्याची पाने, सुपाऱ्या, खारीक, बदाम, सुके खोबरे, पंचामृत आणि सोळा पदरांचा हळद लावलेला ‘दोरक’ फुले व पत्री: जास्वंद, शेवंती, मोगरा, अंबाडीची किंवा तेरड्याची रोपे.

नगरची परंपरा व वेगळेपण नगर जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात गौरी आणण्याच्या विविध पद्धती आहेत. काही ठिकाणी दोन गौरी (ज्येष्ठा व कनिष्ठा), तर काही ठिकाणी महालक्ष्मीचे मुखवटे आणि तिची दोन लेकरे अशी कुटुंब स्वरूपातील मांडणी केली जाते. जुन्या बाजारपेठांमधील पारंपरिक कारागीर हाताने मुखवट्यांचे नक्षीकाम करतात ज्यामुळे नगरच्या गौरींच्या चेहऱ्यावर वेगळेच आध्यात्मिक तेज दिसते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *