Headlines

45 वर्षांपासून प्रबोधन करणारा कसब्याचा राजा‎:माढ्यात 1982 मध्ये स्थापन झालेल्या जय भवानी गणेशोत्सव मंडळाकडून जागर‎




माढ्यातील ऐतिहासिक अशा रावरंभा निंबाळकरराजेंच्या कसबा पेठेतील गढीसमोर (किल्ल्यासमोर) १९८२ सालापासून स्थापन केलेल्या जय भवानी गणेशोत्सव सांस्कृतिक सामाजिक कला क्रीडा मंडळाने समाजरुपी प्रबोधनाचा महाजागर राबवत ठसा उमटवला आहे. जय भवानी गणेश मंडळाची त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमामुळे “कसब्याचा राजा” अशी विशेष ओळख निर्माण केली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे,नगरसेविका संजीवनी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सुशिक्षित तरुण मंडळाचा कारभार नियोजनबद्ध पद्धतीने पुढे चालवत आहेत. या गणेशोत्सव मंडळाने विविध सामाजिक धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक सोहार्द राष्ट्रीय एकात्मता आणी समाज प्रबोधनाचीही पंरपरा अखंडित सुरू ठेवली आहे. मंडळाच्या स्थापने वेळीच कार्यकर्त्याना मान देण्याची प्रथा सुरु केल्याने दरवर्षी नव्या मंडळाच्या सदस्याला अध्यक्षपद दिले जाते. गणेश मंडळाने गणेश मंदिराची उभारणी करू, त्यामध्ये श्रींची मूर्ती अनेक वर्षापासून ठेवली आहे.रावरंभा राजाच्या किल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्यात आलेत. १५ सप्टेंबरला फुलचंद नागटिळक यांचा नटसम्राट हा नाट्यप्रयोग झाला. दि. १८ ला जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत वृक्षारोपण, दि. १९ व २० रोजी मनोरंजनात्मक महिलाचे खेळ, २१ रोजी क्रांतीनाना मळेगावकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम, २२ रोजी रक्तदान शिबिर तर २३ रोजी “चांडाळ चौकडीचा करामतीच्या” हास्यरुपी आणि प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ^पहिल्याच दिवशी रावरंभा राजे निंबाळकरांच्या किल्ल्याची साफसफाई करून गणेशोत्सवाची सुरुवात केली. मनोरंजनातून प्रबोधनाचा जागर करणे हाच आमचा मुख्य दरवर्षीचा उद्देश असतो. तोच कायम ठेवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात सुरुवातीपासूनच मिरवणूक काढली जाते. -अथर्व भांगे, अध्यक्ष, जय भवानी गणेश मंडळ कसबा पेठ माढा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *