.

गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमाची जोड देत श्री नीळकंठ व्यायाम मंडळातर्फे आयोजित सायकल आरोग्य रॅलीत ५०० सायकलस्वार सहभागी झाले. ‘सायकल चालवा, आरोग्य मिळवा’, ‘सायकल चालवा, शरीर तंदुरुस्त राखा’, ‘सायकल चालवा, प्रदूषण टाळा’, ‘सायकल चालवा, हृदयविकार टाळा’ अशा घोषणा देत सायकलस्वारांनी शहरातून जनजागृती केली. गणेशोत्सवानिमित्ताने नियमित सायकल चालवण्याचे आरोग्यदायी फायदे, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही रॅली लक्षवेधी ठरली आहे.
सकाळी ८ वाजता या सायकल आरोग्य रॅलीला सुरुवात झाली. या वेळी रॅलीच्या प्रारंभी हिरवी झेंडी दाखवण्यासाठी विरोधी पक्षनेते विलास इंगोले, स्वागताध्यक्ष सुनील राणा, प्रमुख अतिथी गोविंद कासट, रामकृष्ण कॉलेजच्या प्राचार्या अलका आडे, वसंतराव साऊरकर, मेजर राजेंद्र बघेल, दीपक गुल्हाने, नीळकंठ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष अनंत साऊरकर, गणेशोत्सव अध्यक्ष येश्वर्य खेडकर आदीची प्रमुख उपस्थिती होती. आयोजक अभिनंदन पेंढारी यांनी प्रास्ताविकातून उपस्थित अतिथींचे स्वागत केले. नियमित सायकल चालवल्याने होणारे आरोग्यविषयक फायदे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत रॅलीला हिरवी झेंडी दाखवली.रॅलीत सायकल असोसिएशनचे सदस्य, रामकृष्ण विद्यालयाचे विद्यार्थी, नीळकंठ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.शहरातील जुन्या भागातून सायकलस्वारांनी फेरी काढत नागरिकांत आरोग्य, पर्यावरणाबाबत जनजागृती केली. सायकलचा नियमित वापर केल्याने शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते, प्रदूषण कमी करण्यासाठीही सायकल उपयुक्त ठरते, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.रॅली पुन्हा नीळकंठ चौकात परतल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.कार्यक्रमाला डॉ. घनश्याम मुदगल, मधुकर साऊरकर, धनंजय चतारे, विलास कारंजकर, प्रमोद गंगात्रे, मनोज केवले, रवींद्र इंगळे, श्रेयस शेलूकर, उमेश कोनलाडे, किरण साऊरकर, राजेंद्र गावाफळे, प्रा. राधेश्याम यादव, विजय बर्वे, अविनाश राजगुरे, देमराज मेंटे, बाळू कोनलाडे, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. शंशाक दुबे, राजा चौधरी, सचिन पारेख, विकास केमदेव, संजय मेंडसे, राजेंद्र महाजन, पवनकुमार रामावत, आनंद वानखडे, दिनेश नरसु, जयमाला देशमुख, राजू देशमुख, वर्षा सदार, प्रसाद पंत, प्रविण खानपासोले, प्रदीप झोड, सुभाष गुप्ता, राजकुमार अंबाडकर, प्रदीप खेडकर, राम जोशी, वेद बारलिगे, नरेश अतकरे, नीलेश कारंजकर, सलील केवले, प्रवीण करुले, विजय शेलूकर, सदानंद आरणकर, साईश खेडकर, मल्हार कारंजकर, प्रज्वल खेडकर, संदीप खेडकर, श्रेयस शेलूकर, राजेंद्र केवले, प्रितम भोरे, सचिन खडेकार, मुख्याध्यापिका कविता कुमरे यांच्यासह शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
सायकल रॅलीतील सदस्यांचा सन्मान अमरावती जिल्हा सायकल असोसिएशनच्या वतीने आयोजित सायकल रॅलीत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचा यावेळी श्री नीळकंठ व्यायाम मंडळाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सायकलिंगला प्रोत्साहन देणाऱ्या सायकलस्वारांच्या सहभागाची दखल घेत मंडळाने हा सन्मान केला. कार्यक्रमाचे संचालन दीपक हुंडीकर यांनी केले, तर आभार आनंद पारेख यांनी मानले.