Headlines

राेज 5 जणांना श्वानदंश झाल्याचा निषेध; मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात सोडले कुत्रे:नाशिक जिल्ह्यातील निफाड नगरपंचायतीत आंदाेलन




नगरपंचायत क्षेत्रात 400 हून अधिक मोकाट श्वानांचा उपद्रव असून दररोज पाच ते सहा तर महिन्याला शंभरहून अधिक नागरिकांना श्वानदंश होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांनी थेट मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात चार ते पाच मोकाट श्वान सोडले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलला पैशांच्या नोटांचा हार घालत प्रशासनाच्या कारभाराचा निषेधही करण्यात आला. लहान मुले, वृद्ध तसेच वाहनचालकांना मोकाट श्वानांमुळे धोका निर्माण झाला असून, प्रचंड वेदना व वैद्यकीय उपचार सहन करावे लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही श्वान पकडण्याची आणि नसबंदीची प्रभावी व्यवस्था होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. नागरिकांच्या दैनंदिन त्रासाची तीव्रता प्रशासनाला प्रत्यक्ष दाखवण्यासाठीच कार्यालयात श्वान सोडल्याचे रंधवे यांनी सांगितले. 73 श्वानांचे निर्बिजीकरण नगरपंचायतीच्या वतीने मोकाट श्वानांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत 73 कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. समस्या सोडवण्यासाठी दोनदा निविदा प्रसिद्ध केल्या असून, नागरिकांनीही नगरपंचायतीला सहकार्य करावे. – धीरज भामरे, मुख्याधिकारी, निफाड नगरपंचायत महिन्याला 100 घटना निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेले दररोज पाच ते सहा रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे महिन्याला शंभरहून अधिक श्वानदंशाच्या घटना घडत असल्याचे चित्र आहे. सध्या रुग्णालयात अँटी रेबीज लस उपलब्ध आहे. – डॉ. राजीव तांबाळे, उपजिल्हा रुग्णालय, निफाड उपाययोजना न केल्यास पुन्हा श्वान सोडण्याचा इशारा प्रशासनाने ठोस उपाययोजना करून मोकाट श्वानांचा बंदोबस्त केला नाही, तर नागरिकांच्या उपस्थितीत पुन्हा मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात मोकाट श्वान सोडण्यात येतील, असा इशारा रंधवे यांनी दिला. या वेळी नगरसेविका रुपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे, सचिन खडताळे व कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *