![]()
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन झाले. रात्री झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कार्यक्रमाच्या लेखन टीममधील सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली. विजय कुमार यांच्या अचानक निधनाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसह मित्रपरिवार आणि कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. विजय कुमार राख हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सृजन टीमचा भाग होते. विनोदाची उत्तम जाण असलेले लेखक म्हणून त्यांची ओळख होती. विशेषतः ग्रामीण जीवनातील प्रसंग, तेथील बोलीभाषा, दैनंदिन जगण्यात घडणाऱ्या घटना आणि त्यातील बारकावे ते आपल्या लेखनातून प्रभावीपणे मांडत होते. मराठवाड्यातील होतकरू लेखक म्हणून त्यांनी लेखन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. हास्यजत्रेच्या सृजन टीमचा महत्त्वाचा भाग ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहेत. मात्र, पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांसोबतच कार्यक्रमामागे काम करणाऱ्या लेखक, दिग्दर्शक आणि सृजन टीमचाही त्याच्या यशात मोठा वाटा आहे. विनोदाची संकल्पना, प्रसंगांची मांडणी आणि संवादलेखनाच्या माध्यमातून ही टीम कार्यक्रमाला आकार देते. सचिन गोस्वामी, अरविंद जगताप यांच्यासह अनेक लेखक या सृजन प्रक्रियेत काम करतात. याच टीममध्ये विजय कुमार राख हेही कार्यरत होते. ग्रामीण जीवनातील अनुभव आणि परिसरातील भाषेचा सहज वापर त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये मानली जात होती. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. सचिन गोस्वामींची भावूक पोस्ट विजय कुमार राख यांच्या निधनाची माहिती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक आणि लेखक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. त्यांनी विजय कुमार यांच्या लेखनातील विनोदाची जाण आणि ग्रामीण जीवनातील बारकावे टिपण्याची क्षमता यांचा विशेष उल्लेख केला. गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये विजय कुमार यांच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त करत, ऐन तारुण्यात त्यांचे जाणे हे कलाक्षेत्रासह हास्यजत्रेची टीम आणि त्यांच्या मित्रपरिवारासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले. तसेच ‘हास्यजत्रा’ टीम विजय कुमार यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी नमूद केले. अकाली निधनाने कलाक्षेत्रात हळहळ विजय कुमार राख यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांसह मित्रपरिवारातून शोक व्यक्त केला जात आहे. विनोदी लेखनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवणाऱ्या या लेखकाचा असा अचानक आणि अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या पडद्यामागे काम करणाऱ्या सृजन टीममधील एका महत्त्वाच्या सदस्याच्या निधनाने कार्यक्रमाशी संबंधित कलाकार आणि तंत्रज्ञांमध्येही दुःखाचे वातावरण आहे. विजय कुमार राख यांच्या कुटुंबीयांवर या दुःखद घटनेने मोठा आघात झाला असून, त्यांच्या निधनाने एका होतकरू लेखकाची कारकीर्द अकाली थांबली आहे.
हेही वाचा.. अडीच वर्षांत मी शेतकऱ्यांना थेट कर्जमुक्ती दिली:आता तुमचे साडेतीन रुपये तरी शेतकऱ्यांना मिळालेत का? मुख्यमंत्र्यांच्या टीकेला ठाकरेंचे प्रत्युत्तर मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची दुरवस्था आणि राज्य सरकारचे धोरण यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिवे लावण्याच्या आवाहनावर संताप व्यक्त करताना, “शेतकऱ्यांच्या घरातले वंशाचे दिवे विझत असताना हे दिवे लावून काय साजरे करत आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, मराठवाड्याचे नेतृत्व जाणीवपूर्वक संपवले जात असल्याचा आरोप करताना गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडले नसल्याचा दावाही त्यांनी केला. सविस्तर वाचा…
Source link
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर शोककळा:लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट