![]()
महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच समाजातील वंचित घटक शिक्षण घेऊ शकले. समाजात क्रांतिकारी सामाजिक परिवर्तन घडवण्याची खरी क्षमता केवळ समर्पित शिक्षकांमध्येच असते, हे फुले दाम्पत्याने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी केले. शिवाजी महाविद्यालयात ‘तिफण’ त्रैमासिकाच्या वतीने महात्मा फुले जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विजय भोसले, ज्येष्ठ विधिज्ञ कृष्णा जाधव, उपप्राचार्य बी. के. मगर आणि अभय आहेर उपस्थित होते. या सोहळ्यात शाळा-महाविद्यालयांच्या चौकटीबाहेर जाऊन लोकशिक्षणाचे कार्य करणाऱ्या कवयित्री प्रा. प्रतिभा अहिरे, प्रा. संजय भालेराव, डॉ. उदय डोंगरे, डॉ. प्रकाश खेत्री, प्रा. के. एल. भानुसे, प्रा. आर. एम. घोती, डॉ. रामचंद्र झाडे, रामनाथ टेकाळे, प्रवीण दाभाडे, दीपाली घुगे, अनिता राठोड व किशोर घुगे यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रा. संजय भालेराव, डॉ. प्रकाश खेत्री व डॉ. उदय डोंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यास प्रा. भूषण मगरे, प्रा. अलका गडकरी, प्रा. दादासाहेब शिंदे, प्रा. सुनील गोरडे, प्रा. जगदीश भेलोंडे, प्रा. विश्वंभर देशपांडे, प्रा. एस. बी. कोल्हे, प्रा. युसुफ शेख, प्रा. रणजित पवार, प्रा. बी. एच. गायकवाड, पूजा चव्हाण आणि साक्षी धनेधर यांच्यासह शिक्षक व प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मंगेश जाधव यांनी केले, मानपत्र वाचन सुनील गोरडे यांनी, तर डॉ. रामचंद्र झाडे यांनी आभार मानले. समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे अमूल्य योगदान प्राचार्य विजय भोसले म्हणाले की, विद्यार्थ्यांसह समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे अमूल्य योगदान असते. प्रास्ताविकात डॉ. शिवाजी हुसे यांनी, हे पुरस्कारार्थी शिक्षक फुले-शाहू-आंबेडकरांच ी मानवी मूल्ये समाजात रुजवत असल्याचे सांगितले. कृष्णा जाधव यांनी महात्मा फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. सत्काराला उत्तर देताना प्रा. प्रतिभा अहिरे यांनी पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याची भावना व्यक्त केली.
Source link
सामाजिक परिवर्तन घडवण्याची क्षमता शिक्षकातच : नायब तहसीलदार सोनवणे:समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे अमूल्य योगदान