Headlines

चांदवड‎:तिसगावच्या राम कृष्ण हरी मंडळाचे 13 वर्षांपासून सामाजिक उपक्रम




तालुक्यातील तिसगाव येथे ‘एक गाव-एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आलेली आहे. येथील राम कृष्ण हरी गणेश मित्र मंडळाचे हे तेरावे वर्ष आहे. धार्मिक, सांस्कृतिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमावर या मंडळांने भर दिलेला आहे. या मंडळाच्या माध्यमातून ग्रामस्थांकडून जमा झालेल्या लोकवर्गणीतून समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. यात हरिकीर्तनाचे आयोजन, टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक, महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी शालेय स्पर्धा, वयोवृद्ध नागरिकांसाठी डोळे तपासणी शिबिर, शेतकऱ्यांसाठी व्याख्येने, महिलांसाठी भजने, वृक्षारोपण अशी विविध समाजउपयोगी उपक्रम घेण्यात येतात. वर्गणीतून पैशांची बचत होऊन त्याचा उपयोग समाजकार्यासाठी होत आहे. मंडळाने आतापर्यंत जिल्हा परिषद शाळेसाठी पोडियम, छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयासाठी स्टेज लोकवर्गणीतून उभारलेले आहे. मंडळात केलेल्या सजावटीतील रोपांचे नंतर ग्रामस्थांकडून वृक्षारोपण केले जाते. त्यातून वृक्ष संवर्धनाचा संदेशही दिला जातो. या मंडळाने शिस्तबद्ध मिरवणूक, सामाजिक एकोपा व सार्वजनिक उपक्रम राबवल्याबद्दल आतापर्यंत पोलीस प्रशासनाकडून दिला जाणारा नाशिक जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार व दोन वेळेस चांदवड तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार पटकावलेला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दीपक गांगुर्डे यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *