Headlines

खोट्या लग्नाचा बनाव; मध्य प्रदेशातील व्यक्तीची फसवणूक:लग्न लावून देण्याच्या नावाखाली तोतयागिरी; चौघांवर गुन्हा‎




मुलाचे लग्न लावून देण्याच्या नावाखाली थेट खोट्या विवाहाचा बनाव रचून १ लाख ५ हजार रुपये उकळल्याचा प्रकार खामगावात समोर आला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील ६० वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध फसवणुकीस गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी १७ सप्टेबर रोजी पोलिसांच्यावतीने कारवाई करण्यात आली. शांतीलाल सुखराम बरळले (वय ६०), रा. ग्राम गवल बडूद, जि. खरगोन, मध्य प्रदेश हे खामगावात मुलासाठी मुलगी बघण्यासाठी आले होते. यावेळी शहरातील महाकाल चौक परिसरातील आरोपींनी त्यांना हेरुन त्यांच्या मुलाचे लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले. या प्रक्रियेत आरोपींनी त्यांच्याकडून १ लाख ५ हजार रुपये घेतले गेले. रक्कम गेल्यावर ही मुलाच्या लग्नाचा विषय होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बरले यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. बरळले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी १६ सप्टेंबर रात्री ९.२४ वाजता अ ारोपी उषा सुकळकळे (महाकाल चौक, खामगाव), सोहम ऊर्फ राजेश वर्मा (अकोला), हरी इंगळे (अकोला) व प्रज्ञा गायगोळ (खामगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *