Headlines

Chandrashekhar Bawankule Amravati Visit; Drought Inspection & Farmers Aid


“राज्यात पावसाने तब्बल 35 ते 40 दिवस ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यात मी ज्या बांधावर उभा आहे, तिथे सलग 39 दिवस पावसाचा खंड पडला असून सोयाबीनचे पीक पूर्णपणे हातचे गेले आहे आणि आता कापूसही धोक्यात आला आहे. ही एक मोठी नैस

.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी दुष्काळी उपाययोजना, विजेची समस्या, सॅटेलाईट पंचनामे आणि नांदेडच्या बैठकीतील वादावर सविस्तर भूमिका मांडली.

अमरावतीत सलग 39 दिवसांचा खंड; सोयाबीन उद्ध्वस्त, कापूसही धोक्यात

अमरावतीतील विदारक परिस्थिती मांडताना बावनकुळे म्हणाले, अमरावती जिल्ह्यात तब्बल 39 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन पीक पूर्णपणे जळून गेले आहे. कसाबसा तग धरून असलेला कापूसही आता माना टाकत असून, परतीचा पाऊस समाधानकारक झाला तरच तूर वाचू शकेल, अशी अत्यंत चिंताजनक स्थिती आहे.

2017-18च्या धर्तीवर निर्णय

“यापूर्वी 2017 आणि 2018 मध्ये ज्याप्रमाणे दुष्काळी परिस्थिती हाताळून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली होती, त्याच धर्तीवर यंदाही देवेंद्र फडणवीस सरकार ठोस निर्णय घेईल. महसूल, कृषी आणि मदत व पुनर्वसन विभागाचे अंतिम अहवाल येताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसान भरपाई आणि विविध सवलतींचे पॅकेज जाहीर केले जाईल.” केवळ आर्थिक मदत देऊन भागणार नाही, तर दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, रोहयोची कामे आणि इतर निकषांनुसार सर्वंकष दिलासा दिला जाईल.

शेतकऱ्यांसाठी दिवसा 12 तास वीज देण्याचे निर्देश; महावितरण यंत्रणेला अलर्ट

शेतात थोडेफार पाणी असलेल्या शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी वीज यंत्रणेबाबत त्यांनी तातडीने पावले उचलली. “मी स्वतः महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांच्याशी थेट संपर्क साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना दिवसा १२ तास सुरळीत व पूर्ण दाबाने वीज मिळालीच पाहिजे, याचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.”

जळालेले विद्युत रोहित्र (DTC/DP) युद्धपातळीवर बदलणे आणि बंद पडलेले सोलर कृषी पंप तातडीने पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमरावतीचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंते स्वतः शेतात फिरून वीजपुरवठ्यातील त्रुटी तात्काळ दूर करतील.

केंद्राच्या मदतीची वाट पाहणार नाही

शासकीय निकष आणि पंचनाम्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी पारदर्शकता स्पष्ट केली. “आता तलाठी बांधावर गेला नाही तरी कोणी कोणाची दिशाभूल करू शकत नाही. शासनाकडे ई-पीक पाहणीचा अचूक डेटा, गुगल सॅटेलाईट इमेजेस आणि महसूल अहवाल उपलब्ध आहेत. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे १०० टक्के पारदर्शक आणि अचूक पंचनामे केले जातील, जेणेकरून एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही.”

तिवसा, धामणगाव, चांदूर रेल्वे हे तालुके पहिल्या तांत्रिक ट्रिगरमध्ये सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये असलेल्या चिंतेवर बोलताना ते म्हणाले, “शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. मागील वेळी सततच्या पावसामुळे अमरावतीला ट्रिगरबाहेर जाऊन ११५० कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी दिली होती. नियमांमध्ये दुरुस्ती करण्याचे पूर्ण अधिकार राज्य शासनाला आहेत, त्यामुळे एकाही बाधित गावाला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही.”

महसूल मंडळ पातळीवर पर्जन्यमापक यंत्रे कार्यरत आहेत. मात्र १० किलोमीटरच्या अंतरावर पावसाचे प्रमाण बदलत असल्याने, भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्रे बसवण्याबाबत जिल्हा नियोजन समिती (DPC) मार्फत सकारात्मक मार्ग काढला जाईल.

नांदेडमधील काजू-बदाम प्रकरणावर मंत्र्यांची पाठराखण

नांदेड येथील आढावा बैठकीत सुकामेवा ठेवल्यावरून सुरू असलेल्या वादावर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. “कलेक्टर ऑफिसच्या बैठकीत कोणीतरी प्लेट्स आणून ठेवल्या, तर त्यात मंत्र्यांचा काय दोष? मंत्र्यांनी काय काजू-बदाम खाण्यासाठी मागवले होते का? अशा किरकोळ गोष्टींवरून नरेटिव्ह तयार करणे अत्यंत चुकीचे आहे.”

“आमचे सरकार पूर्णपणे संवेदनशील आहे. अशा वादांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे आणि त्यांचा आवाज मंत्रिमंडळात मांडून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणे हीच आमची खरी जबाबदारी आहे आणि ती आम्ही चोख पार पाडत आहोत.”

—————–

हेही वाचा…

50-100 रुपयांच्या बदामावरून राईचा पर्वत करू नका?: नांदेड दुष्काळ बैठकीतील काजू-बदामाच्या प्रश्नावर खासदार संजय जाधव पत्रकारांवर भडकले

नांदेड येथील विभागीय दुष्काळ आढावा बैठकीत सुकामेव्यावर ताव मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकारावरून राज्यभरातून टीकेची झोड उठत असतानाच, यावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांवर परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव चांगलेच संतापले. “मी काय माणूस नाही का? भूक लागली म्हणून खाल्ले; 50-100 रुपयांच्या सुकामेव्यावरून राईचा पर्वत कशाला करता? हा मीडियाचा फालतू धंदा आहे,” अशा शब्दांत त्यांनी पत्रकारांवरच संताप व्यक्त केला. दरम्यान, या प्रकारावर सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अन् दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांचा काजू-बदामावर ताव! : नांदेडमधील आढावा बैठकीतील प्रकाराने सरकारवर टीकेची झोड

महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे भीषण सावट पसरले आहे. शेतात उभी असलेली खरीप पिके डोळ्यांदेखत करपून गेली असून, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. शेतकरी सरकारकडून तत्काळ दुष्काळ जाहीर होण्याची आणि आर्थिक मदतीची चातकासारखी वाट पाहत असतानाच, नांदेडमध्ये राज्यकर्त्यांच्या असंवेदनशीलतेचे संतापजनक आणि चीड आणणारे दर्शन घडले आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत चक्क मंत्री, खासदार आणि आमदारांसाठी काजू-बदामाचा शाही पाहुणचार ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधी काजू-बदामावर ताव मारत दुष्काळाची चर्चा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

नांदेड बैठकीतील काजू-बदामावर फडणवीसांची नाराजी: केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; दुष्काळावर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट येण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर दुष्काळी परिस्थितीची राज्य सरकारने सर्वोच्च दखल घेतली असून, केंद्राच्या आर्थिक मदतीची अजिबात वाट न पाहता राज्य शासन आपल्या स्वतःच्या तिजोरीतून बळीराजाला तातडीने आर्थिक व इतर सर्वतोपरी मदत देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळी उपाययोजना, कर्जमाफी, पाणी-चाऱ्याचे नियोजन आणि विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांवर सरकारची भूमिका अत्यंत सविस्तरपणे मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.