Headlines

डोळ्यांच्या उपचारासाठी पहाटे आलेल्या तरुणीवर अत्याचार:घाटी रुग्णालय परिसरात मित्राने मारहाण करत नेले सोबत




डोळ्यांवरील उपचारासाठी घाटीत आलेल्या एका 20 वर्षांच्या तरुणीवर शनिवारी (19 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना घाटी रुग्णालय परिसरात 19 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. रिक्षाचे मीटर लागून डोळ्याला दुखापत झाल्याने पीडिता पहाटे 3 वाजता मित्रांसोबत घाटीत आली होती. तेथे सोनोग्राफीसाठी जात असताना तिचा ओळखीचा मित्र विशाल प्रकाश चावरिया (रा. घाटी क्वार्टर्स) याने त्याचा मित्रांनी दोघांनी मारहाण करत दुचाकीवर बसवत नेले. हा सर्व प्रकार घाटीतील एका वॉचमॅनसमोर झाल्याचे पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.रोहन जगदीश रिडलॉन (रा. मुंबई) याने तिच्यावर अत्याचार केला. प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मोबाइल बंद करत चकवा मुख्य आरोपी रोहन रिडलॉन याने अंधाराचा फायदा घेत पळ काढला आणि टाऊन हॉलमार्गे जाऊन जालन्याला जाणारी खासगी बस पकडली. लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून तो प्रवासात वारंवार मोबाइल बंद करत होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने त्याला ट्रॅक केले. अवघ्या 5 तासांत त्याच्या मुसक्या आवळल्या. रोहन मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असून तो आई-वडिलांच्या मृत्यू प्रमाणपत्राच्या कामासाठी शहरात आला होता. मृत्यू प्रमाणपत्रासाठी आला अन् गैरकृत्य केले आरोपी विशाल सापडला घटनास्थळी जुन्या क्वार्टर्सच्या दिशेने रात्रीच्या वेळी सुरू असलेला हा संशयास्पद प्रकार एका सतर्क नागरिकाच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने डायल 112 ला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून गस्तीवरील पोलिसांनी अवघ्या 5 ते 6 मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच खाली थांबलेल्या विशालला जागेवरच पकडण्यात आले आणि पीडितेची सुटका केली. घाटीतील रुग्णांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह रात्री-अपरात्री उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेने चव्हाट्यावर आला आहे. घाटी परिसरात वॉचमॅनची गस्त अत्यंत कमी असल्याने यापूर्वीही लूटमारीचे आणि गैरप्रकारांचे प्रकार घडले आहेत. एका महिला रुग्णाला अशा प्रकारे निर्जनस्थळी नेले जात असताना वॉचमॅन असतानाही असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निमित्ताने रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था आणि गस्त वाढवण्याची तातडीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *