Headlines

जप्त ट्रॅक्टर माजी आ. जाधवांकडून तहसीलच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न:कन्नड शहरामधील घटना, प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखलची मागणी‎




कन्नड तहसील प्रशासनाने अडीच महिन्यांपूर्वी जप्त केलेला वाळूचा ट्रॅक्टर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी स्वतः चालू करून तहसील आवारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टरच्या चाकातील हवा काढून घेतलेली असल्याने ट्रॅक्टर पुढे सरकू शकला नाही आणि जाधव यांचा हा प्रयत्न अपूर्ण राहिला. याबाबत जाधव म्हणाले, सारोळा येथील शेतकरी अजिनाथ ढमाले हे स्वतःच्या शेतातील वाळू गावातील मंदिराच्या कामासाठी घेऊन जात होते. तत्कालीन मंडळ अधिकारी विकास वाघ यांनी हा ट्रॅक्टर ताब्यात घेतला, रितसर पंचनामा केला नाही. अडीच महिन्यांपासून ट्रॅक्टर तहसील आवारात उभा करून ठेवला आहे. त्यामुळे पोलिसांनी तहसील प्रशासनाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करावा. अजिनाथ ढमाले म्हणाले, आम्ही सर्व कागदपत्रे देऊनही ट्रॅक्टर सोडला नाही आणि पंचनाम्याची प्रत दिली नाही. जुन्या मारहाण प्रकरणाशी माझा संबंध नाही, याची चौकशी करावी. वाळू वाहतूकदारावर आधीच ३ गुन्हे दाखल मंडळ अधिकारी विकास वाघ म्हणाले, ढमाले यांना ट्रॅक्टर-ट्रॉलीतून वाळू वाहतूक करताना पकडले. त्यांच्यावर वाळूचोरीचे आधीच ३ गुन्हे दाखल आहेत. तलाठी नवले यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *