![]()
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने २४ जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. बँकेची प्रारूप मतदार यादी २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याबाबतची अधिकृत अधिसूचना विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी जारी केली आहे.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि निवडणूक नियम २०१४ नुसार, १ जुलै २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित प्रतिनिधींचे ठराव १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत मागविण्यात आले होते. या प्राप्त ठरावांच्या आधारे ही प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीवर कोणाचे काही आक्षेप किंवा हरकती असल्यास, त्या २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत (सार्वजनिक सुट्ट्या वगळून) कार्यालयीन वेळेत पुराव्यासह दाखल कराव्या लागणार आहेत. आक्षेपकर्त्यांनी त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी नोंदवून स्वतंत्ररीत्या लेखी स्वरूपात विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (पुणे विभाग) यांच्या कार्यालयात हे आक्षेप दाखल करणे अनिवार्य आहे. विहित मुदतीनंतर आलेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 1. विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालय, साखर संकुल, पुणे. 2. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., मुख्य कार्यालय. 3. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालय, सोलापूर. 4. जिल्ह्यातील सर्व तालुका उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय व सहाय्यक निबंधक (दुग्ध), सोलापूर. 5. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अधिकृत संकेतस्थळ. प्रतिनिधी | बार्शी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय मंडळींच्या हालचालींना वेग आला आहे. येथील आमदार राजेंद्र राऊत यांनी मागील संचालक मंडळाच्या कारभाराविरोधात आवाज उठवल्यानंतर बँकेच्या गैरकारभाराची लक्तरे त्यांनी वेशीला टांगली. अखेर सहकार कायद्याच्या कलम ८३ अन्वये चौकशी होऊन ८८ अन्वये संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित केली आहे. सदर बाबत स्थगिती मिळावी, बँकेवर वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप आमदार राजेंद्र राऊत हे राजकीय व्यूव्हरचना आखत आहेत. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी तसेच करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप तसेच मंगळवेढ्याचे ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे, आमदार नारायण पाटील यांनी नुकतीच बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांची सदिच्छा भेट घेतली. आमदार राऊत यांनी उभय नेत्यांचे स्वागत करून सत्कार केला. संबंधित संचालकांनी सहकारमंत्र्यांच्याकडे स्थगितीसाठी अपील केले आहे. त्यावरील सुनावणी अचानक रद्द झाली. त्यामुळे सद्यस्थितीत या संचालक मंडळातील इच्छुक निवडणूक लढवण्यास अपात्र आहेत. .प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे: २१ सप्टेंबर २०२६ .आक्षेप व हरकती स्वीकारणे: २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर .आक्षेप/हरकतींवर निर्णय देण्याचा अंतिम दिनांक: ९ ऑक्टोबर .अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे: १४ ऑक्टोबर २०२६
Source link
डीसीसी बँकेची प्रारूप मतदार यादी उद्या होणार प्रसिद्ध:गाठीभेटी सुरू, 30 सप्टेंबरपर्यंत आक्षेप, हरकतींची मुदत; 14 ऑक्टोबर असणार