Headlines

आमदार-खासदार फोडले म्हणून सरकारला लोकांची गरज उरली नाही:शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या- रोहित पवार




धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरात दुष्काळस्थितीची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून जर राज्य सरकारला निधी हवा असेल, तर त्यांनी शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारकडे जावे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शरद पवार हेही तुमच्यासोबत दिल्लीला येतील, तुम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज घेऊन या, असे थेट आव्हान रोहित पवार यांनी सरकारला दिले. रोहित पवार म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. आमदार आणि खासदार फोडले की काम झाले, आता आपल्याला लोकांची काय गरज आहे, असा आविर्भाव या सरकारचा झाला आहे. म्हणूनच ते सामान्य शेतकरी अन् जनतेकडे दुर्लक्ष करत आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. सोयाबीनचे 100% नुकसान रोहित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काहीच उरलेले नाही. सोयाबीनचे पीक 100 टक्के वाया गेले आहे. नंतर काही ठिकाणी पाऊस झाला असला, तरी जे नुकसान व्हायचे ते आधीच झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, मागील वेळी झालेल्या अतिवृष्टीची मदत अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही, ती तात्काळ वितरीत करण्याची मागणी त्यांनी केली. कर्जमाफी अन् विम्याच्या आश्वासनांचा फुसका बार रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विम्याचे साडेसतरा हजार रुपये सरसकट मिळतील असे सांगितले होते, मात्र वर्ष उलटून गेले तरी ते पैसे मिळाले नाहीत. सरकारने सुरुवातीला फसवी कर्जमाफी केली, आम्ही आंदोलने केल्यानंतर अटी हटवल्या; पण दुर्दैवाने आजही 43 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांना मदत देण्याची आणि पुढील 5 दिवसांत चारा छावण्या सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. इतर राज्यांचे दाखले देत सरकारला टोला रोहित पवार म्हणाले की, कर्नाटकमध्ये दुष्काळ जाहीर करून अधिवेशन घेतले जात आहे, तमिळनाडूनेही दुष्काळ जाहीर केला आहे. आपल्या राज्यापेक्षा छोटी असलेली राज्ये जर शेतकऱ्यांसाठी काम करू शकतात आणि निधीसाठी थेट पंतप्रधानांची भेट घेऊ शकतात, तर आपल्या राज्यातील नेत्यांना निर्णय घेण्यासाठीच दुष्काळ पडला आहे का? असा खोचक टोला त्यांनी लगावला. हे ही वृत्त वाचा मुंबईत कोस्टल रोडवर भरधाव BMW ने 4 जणांना चिरडले:3 जणांचा मृत्यू, एक गंभीर; मरीन ड्राइव्हहून हाजी अलीकडे जात होती कार
दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवर आज पहाटे 5:20 वाजता एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला, तर 20 वर्षांचा एक तरुण गंभीर जखमी आहे. मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीकडे जाणाऱ्या भरधाव काळ्या रंगाच्या कारचा लाला लजपतराय कॉलेजसमोरील लोटस जेट्टीजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार जोरदार धडकली आणि तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *