Headlines

समृद्धीच्या माळीवाडा टोलवरील कर्मचारी पळाले; वाहने सुसाट:टाेल कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या भावाचा गाेंधळ




माळीवाडा येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर रविवारी सायंकाळी मोठा गोंधळ उडाला. अपघातात मृत्यू झालेल्या एका कर्मचाऱ्याच्या भावाने टोलनाक्यावर येत गोंधळ घातला. त्यामुळे २० मिनिटे माळीवाडा एंट्री नाक्यावर वाहतूक ठप्प झाली. गोंधळामुळे टोलनाक्यावरील कर्मचारी निघून गेले. त्यानंतर सिग्नल बूम उघडाच राहिल्याने अनेक वाहने न थांबता सुसाट निघून गेली. माळीवाडा टोलचे व्यवस्थापक संजय लांडगे आणि सुपरवायझर पियुष दाणे राजस्थानला फिरायला गेले होते. १८ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. यात सुपरवायझर पियुष यांचे निधन झाले, तर लांडगे जखमी झाले. २० सप्टेंबर रोजी पियुष यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सायंकाळी पियुष यांचा भाऊ टोलनाक्यावर आला आणि त्याने गोंधळ घालत काही काळ वाहतूक रोखून धरली. काही वेळाने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाजूला केले. मात्र, या घटनेनंतर गावातील काही युवक नाक्यावर आल्याने टोल कर्मचारी नाका सोडून निघून गेले. रात्री उशिरापर्यंत कर्मचारी नसल्याने अनेक वाहने प्रत्यक्ष तपासणीशिवाय पुढे जात होती. टोलचा बूम खुला असल्याने वाहनचालकांना टोल न भरताच प्रवास करता येत असल्याचे वाटले. मात्र, फास्टॅगच्या नियमानुसार प्रवेशबिंदूच्या आधारे त्यांच्या खात्यातून टोलची रक्कम स्वयंचलितपणे वसूल होणार आहे. नेमके काय घडले : ७-८ लोकांची कर्मचाऱ्यांना शिवीगाळ माळीवाडा (वेरूळ टोल) आयसी-१७ इन-आऊट पॉईंटवर सात ते आठ गावकरी आले. मृत कर्मचाऱ्याचा भाऊ असल्याचे सांगत त्यांनी टोल बंद ठेवण्याची मागणी केली आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. ‘माझा भाऊ टोलवर कामाला होता, त्याचा अपघातात मृत्यू झाल्याने टोल बंद ठेवा,’ अशी त्यांची मागणी होती. यावेळी सुरक्षा रक्षक दिनेश कोल्हे, मिथुन राठोड आणि शिवाजी बेळे टोलनाक्यावर उपस्थित होते. या घटनेची माहिती महामार्ग नियंत्रण कक्षाला देण्यात आली.शिवीगाळ केली. ‘माझा भाऊ टोलवर कामाला होता. त्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे टोल बंद ठेवा,’ अशी त्यांची मागणी होती. यावेळी सुरक्षा रक्षक दिनेश कोल्हे, मिथुन राठोड आणि शिवाजी बेळे हे द्वितीय सत्रात टोलनाक्यावर उपस्थित होते. घटनेची माहिती महामार्ग नियंत्रण कक्षाला देण्यात आली. कर्मचारी नसला तरी एंट्री होते, टोलही वसूल होतो समृद्धी महामार्गावर एक्झिट (बाहेर पडण्याच्या) टोलनाक्यावर कर्मचारी नसले किंवा बूम (दांडा) उघडा असला, तरीही ‘फास्टॅग’ प्रणाली वाहनाच्या प्रवेशबिंदूची नोंद घेते. त्यामुळे नाक्यावरून न थांबता गाडी पुढे गेली, तरीही प्रणालीद्वारे प्रवासाच्या टप्प्यानुसार योग्य टोलची रक्कम खात्यातून आपोआप वजा होतेच. … आणि महासंचालकांनी
घेतली समृद्धीची ‘झाडाझडती’ एकीकडे टोलनाक्यावर गोंधळ सुरू असतानाच, रविवारी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते हे मुंबईहून संभाजीनगरला एका कार्यक्रमासाठी समृद्धी महामार्गाने येत होते. त्यांनी महामार्गावरील ‘रिस्पॉन्स टाईम’ आणि सुरक्षा व्यवस्थेची अचानक तपासणी केली. या पाहणीत सुरक्षेतील काही त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधितांची कानउघाडणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *