Headlines

चिंचोली ते चिंचोली पाटी मार्गाचे काम निकृष्ट, 2महिन्यात रस्ता उखडला:मनमानी करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाईसाठी निवेदन‎



तालुक्यातील एकंबी ते चिंचोली (का.) राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण होऊन अवघे दोन महिने उलटत नाहीत, तोच रस्ता पूर्णपणे उखडायला लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

.

या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम ठेकेदाराने अत्यंत मनमानी पद्धतीने आणि नियम धाब्यावर बसवून केले आहे. रस्त्यासाठी आवश्यक असणारा खडी आणि मुरुमाचा थर अत्यंत कमी प्रमाणात टाकण्यात आला असून, डांबराचा नावापुरता वापर करण्यात आला आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर जेमतेम एक-दोन महिन्यांतच रस्त्यावरील डांबर आणि खडी सुटी होऊन रस्ता उखडला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था कायम राहिल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन उपविभागीय अभियंत्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर तात्काळ फौजदारी किंवा कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत तीव्र पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. जर दोषी ठेकेदारावर तात्काळ कायदेशीर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.

दोन महिन्यांतच रस्ता खराब, चौकशी व्हावी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी जनतेच्या सुविधेसाठी दिला आहे, ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी नाही! चिंचोली ते चिंचोली पाटी रस्त्याचे काम करताना इस्टिमेटला पूर्णपणे हरताळ फासला गेला आहे. डांबर आणि खडीचा वापर इतक्या कमी प्रमाणात झालाय की अवघ्या दोन महिन्यांत रस्ता हाताने उखडतोय. हा सरळ सरळ जनतेच्या पैशांचा अपहार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी. काका पवार (उपसरपंच, चिंचोली काजळे)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *