देवेंद्र फडणवीस म्हणजेच ‘देवाभाऊंचे’ नाव ऐकताच मातोश्री, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हादरले आहेत. त्यांना राजकीय भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचे संजय राऊत यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. जनता देवाभाऊंना निवडून द
.
नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी देवाभाऊंचा नाद सोडून दिला आहे, त्यामुळे संजय राऊत यांनीही देवाभाऊंचा नाद करू नये. विरोधी पक्षनेता हा एक चांगला नेता असावा लागतो, अभिनेता नाही. अभिनेता हा चित्रपटात काम करतो, तर नेता जनतेची कामे करत असतो. दुर्दैवाने तुम्ही एका अभिनेत्याला नेता म्हणून निवडल्यामुळेच तुमची आज ही वाईट अवस्था झाली आहे. राहुल गांधी जर चांगले अभिनेते असतील, तर त्यांनी चित्रपट किंवा कॉमेडी सर्कसमध्ये काम करावे; जनतेच्या प्रश्नांवर उगाच कॉमेडी शो करू नये. जनतेने त्यांना आधीच नाकारले आहे.

शरद पवारांचा पगार बंद झाला म्हणून नवीन मालक शोधला
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत कालपर्यंत शरद पवारांकडून पगार घेऊन त्यांची चाकरी करत होते. आता कदाचित पवारांकडून मिळणारा पगार बंद झाला असावा आणि राहुल गांधींकडून जास्त पगार सुरू झाल्यामुळे ते पवारांना सोडून राहुल गांधींची चाकरी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण ‘उबाठा’ गट संपवून नवीन मालक शोधण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे. बाण कुठे घुसला आहे, हे मातोश्रीवर जाऊन विचारावे. महाराष्ट्रातील जनतेने तुमच्या काळजाच्या आरपार बाण ठोकला आहे, म्हणूनच तुम्हाला मातोश्रीवर बसून राहावे लागले आहे. ‘नटरंग’ चित्रपटातील गणपत पाटलांना लाजवेल अशी नौटंकी राऊतांनी आज केली आहे. गणपत पाटील ज्या पद्धतीने तमाशात बसून भूमिका करायचे, त्याच पद्धतीने संजय राऊत आज गणपत पाटलांच्या भूमिकेत आले आहेत.
राऊतांना सिंगापूरच्या रुग्णालयाची गरज
नवनाथ बन म्हणाले, कोणाचा मेंदू बधिर झाला आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. संजय राऊत यांना सिंगापूरमधील मेंटल रुग्णालयाची गरज असून, त्यांच्या उपचारासाठी वर्गणी जमा करायला मी स्वतः तयार आहे. त्या वर्गणीतून त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत. देवेंद्र फडणवीस यांची बुद्धिमत्ता काय आहे हे जनतेने ओळखले आहे, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केले. तुमच्या मेंदूला नारू झाला आहे, त्यामुळे तुम्ही देवाभाऊंवर टीका करू नये, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला.
हे ही वृत्त वाचा संजय राऊतांचा भाजप-फडणवीसांवर घणाघात:म्हणाले- भाजपने शेकडो कोटी खर्च केले, पण आता मोदीच ‘पप्पू’ ठरलेत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यात केंद्र सरकारच्या धोरणांवर केलेल्या टिकेवरून सध्या देशातील राजकारण तापले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“राहुल गांधींनी मारलेला बाण भाजपच्या काळजात आरपार घुसला आहे. राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवण्यासाठी या लोकांनी शेकडो कोटी रुपये खर्च केले, पण आता याच राहुल गांधींनी मोदींना ‘पप्पू’ ठरवले आहे, असा घणाघात राऊत यांनी केला. वाचा सविस्तर