Headlines

पिशोरच्या कर्मयोग गणेश मंडळाने जपला सांस्कृतिक अन् धार्मिक उत्सवाचा वसा:विविध उपक्रमांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा, नामवंतांचे होणार कीर्तन‎



सामाजिक आणि सांस्कृतिक जनजागृतीचा वसा जपला तरच भावी पिढीला “श्रीं”च्या उत्सवाचे मुख्य उद्दिष्ट कळेल ही उदात्त भावना डोळ्यांसमोर ठेवून येथील कर्मयोग गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे आपली वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा म

.

आजच्या डिजिटल युगात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच बाळगोपाळांच्या हातात मोबाइल फोन आल्याने सामाजिक उत्सवांमधील नवीन पिढीचा सहभाग दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळते. मात्र, पिशोर येथील कर्मयोग गणेश मंडळाच्या वतीने आयोजित उपक्रमांमध्ये लहान मुलांपासून ते तरुण वर्गापर्यंत सर्वांचाच भरघोस आणि उत्साही सहभाग पाहायला मिळतो, ही बाब अत्यंत सुखद आणि कौतुकास्पद ठरत आहे.

“गणरायाच्या आगमनाची आणि उत्सवाची तयारी ही साधीसुधी नसते. यासाठी किमान एक महिना आधीपासूनच नियोजनाला सुरुवात करावी लागते. मंडळाचे सर्वच तरुण कार्यकर्ते आणि सदस्य अत्यंत हिरिरीने व निष्ठेने या कामात सहभाग घेतात. सर्वांच्या एकत्रित मेहनतीमुळेच श्रींच्या आगमनाची सर्व तयारी दोन दिवस आधीच पूर्ण होते. दररोज संध्याकाळी गणेशभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते, अशी माहिती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष रामदास तुकाराम दवंगे यांनी दिली. माजी अध्यक्ष शिवाजी चंद्रभान मोकासे म्हणाले की, “आमच्या मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल आजवर विविध पातळ्यांवर घेण्यात आली आहे. मंडळाला आतापर्यंत एकूण २० विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी तब्बल ११ प्रथम क्रमांकाची पारितोषिके आहेत. गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक अतिशय शिस्तीत आणि नियोजित वेळेत पूर्ण होते.’

२५ ला अरुण महाराज जामखेडकर यांचे काल्याचे कीर्तन मंडळाने विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमासोबत कीर्तन सेवा आयोजित केली आहे. यामध्ये २२ तारखेला समाधान महाराज बसंते, २३ तारखेला राधेश्याम महाराज चातुर्मासे़ २४ तारखेला अरुण महाराज जामखेडकर, आणि २५ तारखेला अरुण महाराज जामखेडकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *