Headlines

हिंगोलीत पोलिसांची धडक कारवाई:सिरसममध्ये मटका अड्ड्यावर छापा; 1.30 लाखांच्या मुद्देमालासह 21 जणांवर गुन्हा




हिंगोली तालु्क्यातील सिरसम येथे पोलिसांच्या पथकाने मटका अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात 17 मोबाईल, रोख रकमेसह 1.30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 21 जणांवर बासंबा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 21 गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायावर छापासत्र सुरु करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी पथके स्थापन केली आहेत. या पथकांकडून माहिती घेत छापे टाकले जात आहेत. सिरसम येथे एका ठिकाणी मटका अड्डा सुरु असल्याची माहिती थेट पोलिस अधिक्षकांनाच मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक लोढा यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, उपनिरीक्षक शेषराव माघाडे, उपनिरीक्षक कार्तीक सुरनर यांच्यासह शिघ्रकृती दलाचे कर्मचारी छापा टाकण्यासाठी रवाना केले. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने सिरसम येथे जाऊन छापा टाकला. यामध्ये 21 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 17 मोबाईल, 19 हजार रुपये रोख व इतर साहित्य असा 1.30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक निरदोडे यांच्या तक्रारीवरून भारत इंगळे, हर्षवर्धन पाईकराव, ताराचंद वाढवे, निखिल पाईकराव, विठ्ठल चव्हाण, माधव भिसे, विठ्ठल कपाटे, राधेश्याम बोडके, मोतीराम काळे , कोंडबा बोडखे, सखाराम जाधव, अंकुश सोनटक्के, विकास खंदारे, संतोष राठोड, गजानन करुडे, प्रेम राठोड, ज्ञानेश्‍वर हनवते, गजानन गडदे, मिलींद पठाडे, रोहिदास चव्हाण, कानबा गडदे यांच्या विरुध्द बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक संतोष वाठोरे, सुभाष काळे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *