Headlines

Sanjay Raut Attacks Fadnavis Over Ram Mandir Donation Box Controversy


शरद पवारांना 87 वर्षांचे नेते म्हणणे चुकीचे आहे ते महाराष्ट्र आणि देशातील शेतकऱ्यांचे प्रमुख नेते आहेत. शेती अन् शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जेवढी जाण त्यांना आहे तितका मोठा दुसरा नेता आज राजकारणात नाही. आम्ही सुद्धा मविआचे सर्व नेते आंदोलन करत आहोत, पण

.

संजय राऊत म्हणाले की, दुष्काळाच्या बैठकीसंदर्भात जर कॅबिनेट होणार असेल आणि त्यामध्ये दुष्काळावर चर्चा होणार असेल तर त्यांचे लाईव्ह झाले पाहिजे. जेणं करत शेतकरी आणि सामान्य माणसांना सर्व माहिती मिळेल. कॅबिनेट बैठक ही सर्व पत्रकार, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, शेतकरी नेते बसू शकतील अशा ठिकाणी झाली पाहिजे. आतमध्ये काजू-बदाम खात आणि बाहेर येत शेतकऱ्यांसाठी हे केले ते केले सांगतात ते करू नका.

..त्या पैशातून शेतकऱ्यांना मदत करा

संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त काही कार्यक्रम सरकारतर्फे अजूनही सुरू आहेत. काही ठिकाणी दिवे लावण्याचे काम सुरू आहे ते थांबवले पाहिजे. हा शेकडो कोटींचा खर्च थांबवला पाहिजे. तो पैसा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गुरांच्या छावण्या, चारा छावण्या, पाण्याचे टॅकर यावर खर्च केला पाहिजे. यावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली पाहिजे. बाहेर येऊन कोण काय सांगते यापेक्षा कॅबिनेट बैठकीमध्ये काय होते हे जास्त महत्त्वाचे आहे.

सर्वांना सारखा न्याय हवा

संजय राऊत म्हणाले की, आयआयटीमध्ये एका प्राध्यपकाला आणि डीनला निलंबित केले म्हणतात. त्यांनी एका विद्यार्थ्यांची कॉपी पकडली त्यातून एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केली त्यानंतर इतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. जर प्रशासनातील लोकं कसेही वागले तर त्यांना केवळ समज देऊन सोडले जाते हा चालणार नाही. सर्वांना सारखाच न्याय दिला पाहिजे.

..तर फडणवीस यांनी माफी मागावी

संजय राऊत म्हणाले की, 105 वेळा राम मंदिराची दानपेटी फोडली आणि लुटण्यात आली, देवेंद्र फडणवीस जर खरेच रामभक्त असतील तर त्यांनी माफी मागितली पाहिजे कारण ते चोरांना पाठीशी घालत होते. अजूनही ते चोरांना पाठीशी घालत आहे. रामाचे पैसे चोरले जात आहे हे आम्ही सांगत होतो. आता एसआयटी अहवालामध्ये तसा उल्लेख असून तसाच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याच राम मंदिरासाठी मी कार सेवा केली असे म्हणतात ना मग ते लुटल्याबद्दल माफी मागा.

हे ही वृत्त वाचा

सत्तेसाठी राहुल गांधी बेभान सुटले, पण 140 कोटी जनता मोदींसोबत:निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा काँग्रेसचा डाव- चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी ज्या प्रकारची टीका करतात, ती देशातील जनता कदापि सहन करणार नाही. राहुल गांधी सत्तेत येण्याच्या घाईत बेभान सुटले आहेत; परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी 140 कोटी जनता पंतप्रधान मोदींच्याच पाठीशी ठाम उभी आहे, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आज जगातील प्रत्येक देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रतिमा उंचावली आहे. जगातील 50 हून अधिक देशांनी त्यांना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान दिला आहे. अशा जागतिक स्तरावरील नेत्यावर आणि आपल्या पंतप्रधानांवर केलेली बेताल टीका आम्हाला अजिबात मान्य नाही. काँग्रेस काहीही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करो, जनता राहुल गांधींसोबत नसून मोदींसोबतच आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.