Headlines

प्राथमिक दुष्काळ एक-दोन दिवसांत जाहीर होईल:DCM एकनाथ शिंदे यांची घोषणा, म्हणाले- शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही




आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रामुख्याने दुष्काळ परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. राज्याच्या बहुतांश भागात पिके करपली असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्राथमिक दुष्काळ जो आहे तो एक-दोन दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ज्या भागांमध्ये दुष्काळ सदरसुह परिस्थिती आहे तिकडे देखील प्राथमिक दुष्काळ जाहीर करण्याची मागणी झाली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्राथमिक दुष्काळ जो आहे तो एक-दोन दिवसात जाहीर होईल. तसेच उद्यापासून तालुका पातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत आणि मुख्यमंत्री देखील काही भागांमध्ये जाणार आहेत. मी देखील दुष्काळग्रस्त भागात अमरावतीमध्ये जाणार आहे. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, कठीण प्रसंग शेतकऱ्यांवर आला आहे. उभी पिके करपून गेली आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देणे हे सरकारचे काम आहे. बळीराजा हा आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आहे. आम्ही नेहमी सांगतो की या सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा आहे. ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, त्यावेळेस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. अनेकवेळा एनडीआरएफचे निकष आम्ही डावलून मदत केली होती. यावेळेस देखील मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना शब्द देऊ इच्छितो की शेतकऱ्यांची दसरा दिवाळी काळी होऊ देणार नाही. सरकार गंभीर आहे आणि आजच्या बैठकीत सर्व मंत्रीमहोदयांच्या सुचनांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून याची अंमलबजावणी तातडीने सुरू होणार आहे. जे जे नुकसान झाले आहे ते सगळे मोजले जाणार आहे आणि पंचनामे करून मदत पुरवली जाईल. केंद्र सरकारकडून देखील मदत मागितली जाणार आहे. आज मी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली, त्यानं सूचना दिल्या की जिथे जिथे दुष्काळ आहे तिथे जाऊन पाहणी करावी. येणाऱ्या एक-दोन महिन्यात शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे याची तजवीज सरकारकडून केली जाणार आहे. या ठिकाणी मी हे देखील सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न आहेत त्यांची जबाबदारी शिवसेना घेईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, MPSC संदर्भातही केली मोठी घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि MPSC च्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्याच्या बहुतांश भागात पिके करपली असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, MPSC च्या परीक्षांमध्ये ‘ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न’ आणण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीवर शासन सकारात्मक असून, आगामी काळात MPSC च्या माध्यमातून विक्रमी पदांची भरती केली जाणार असल्याची मोठी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *