Headlines

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा उलटली:चालक जखमी, खंडाळा येथील घटना, 3 महिला, 2 बालके बचावली‎




येथील पाकलेजा पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ऑटो रिक्षाचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव रिक्षा रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन उलटली. यात चालक गंभीर जखमी झाला असून, रिक्षातील तीन महिला आणि दोन बालके सुरक्षित बचावली आहेत. नाशिक येथील माधुरी जगन्नाथ वाणी यांचा बुधवारी अंधानेर येथील चव्हाण कुटुंबात विवाह ठरला आहे. विवाहासाठी कुटुंबातील दोन नातेवाईक महिला व दोन बालकांसह रिक्षाने (क्रमांक एमएच १५ केव्ही ०३५३) कन्नडकडे जात होत्या. खंडाळा गावाजवळ चालक दिनेश जगन्नाथ वाणी यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा विरुद्ध बाजूच्या शेतात उलटली. अपघातात चालक दिनेश वाणी यांना दुखापत झाली, तर तीन महिला किरकोळ जखमी झाल्या. नागरिकांनी धाव घेत जखमी चालकास वैजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *