![]()
वैजापूर शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी २० ते २५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. मात्र, हाच पाऊस एका कुटुंबासाठी काळ बनून आला. फकीराबादवाडी शिवारात शेतात कामासाठी आलेल्या दोन मजुरांवर वीज कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना म
.
प्रकाश कांबळे व दत्तू कांबळे हे शेतात टोमॅटोच्या झाडांना बांधणी करण्यासाठी आले होते. दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने दोघेही बांधावरील झाडाखाली थांबले. याचवेळी वीज कोसळली. त्यात प्रकाश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शेजारी असलेले दत्तू कांबळे गंभीर जखमी झाले. व स्थानिकांनी दोघांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणीनंतर प्रकाश कांबळे यांना मृत घोषित केले. {उघड्यावर असल्यास : विजेचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, विजेच्या खांबांजवळ किंवा पाण्याच्या स्रोताजवळ (तलाव/विहीर) उभे राहू नका. {सुरक्षित स्थिती : सुरक्षित आसरा न मिळाल्यास दोन्ही पाय जवळ आणून, हाताने कान झाकून जमिनीवर टाचांवर बसा (जमिनीवर सरळ झोपू नका). {घरातील काळजी : विजेची उपकरणे प्लगवरून काढून टाका.
पाऊस सुरू असल्यावर झाडाखाली जाणे टाळावे