![]()
कन्नड तालुका शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन विनोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत संस्थेच्या ३८ लाख ३२ हजार ३६१ रुपयांच्या नफा विभागणीस मंजुरी देण्यात आली, तसेच सभासदांना ८ टक्के दराने कर्जपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सभेदरम्यान गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला, तर आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे सचिव दिनेश निकम यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला. विनोद अंभोरे यांनी पतसंस्थेची आर्थिक वाटचाल सक्षम असल्याचे सांगत शिस्तबद्धतेवर भर देण्याचे आवाहन केले. सभेत ताळेबंद व अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. निवृत्त सभासदांना पेन्शन देणे, वर्गणीवरील व्याजदर १० टक्के करणे, मुदत ठेवींवरील व्याजदर ८ टक्के करणे, एमआयएस व टीआरडी योजना यांसारख्या विविध ठरावांना मान्यता देण्यात आली. काही सभासदांनी मागण्यांचे फलक घेऊन सभागृहात प्रवेश केला, ज्यावर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या प्रसंगी चेअरमन विनोद पवार, कैलास झोड, संजय केवट, गणेश सोनवणे, ईश्वर वैष्णव, बाळासाहेब हिलाले, सुनीता मोरे, दीपक पवार, कल्याण पवार, भूषण पंडित, नंदकिशोर नागणे, गणेश दवंगे, उमेश हुकूमदार, योगेश बोडखे, विजय खैरनार, कारभारी मालकर, सूरज जाधव, संदीप खरे, मनीषा देवरे आदींसह सभासद उपस्थित होते.
Source link
कन्नड तालुका शिक्षक पतसंस्थेची सभा उत्साहात:वार्षिक सर्वसाधारण सभा, 38 लाख 32 हजारांचा नफा