Headlines

वाशिममध्ये किरकोळ वादाचा थरारक शेवट! पुतण्याने काकावर कुऱ्हाडीने सपासप वार:55 वर्षीय अशोक जाधव यांचा मृत्यू, आरोपी फरार




शहरातील गवळीपुरा परिसरात कौटुंबिक वादातून 55 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून काका आणि पुतण्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि पुतण्याने काकावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत काका गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पुतण्या फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. नेमकं प्रकरण काय? गवळीपुरा परिसरात राहणारे अशोक जाधव (वय 55 ) यांचा त्यांचा पुतण्या रवी जाधव याच्यासोबत गुरुवारी किरकोळ कारणावरून वाद झाला. दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, वाद वाढत गेल्याने परिस्थिती हातघाईवर पोहोचली. याचदरम्यान रवी जाधव याने कुऱ्हाड घेऊन अशोक जाधव यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. कुऱ्हाडीच्या वारामुळे अशोक जाधव गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे किरकोळ वादाचा शेवट थेट हत्येत झाल्याने परिसरात खळबळ उडाली. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान, हल्ल्यानंतर रवी जाधव घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असून, हत्येमागील नेमके कारण काय होते, वाद कशामुळे झाला आणि हल्ल्याच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत. हेही वाचा…. चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य:पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार दोन दिवसांत ठरणार महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीतील उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही जागांवर महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय महायुतीच्या घटक पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *