![]()
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालय यांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ आरोग्य अभियान २०२६ अंतर्गत तपोवन हडक
.
द साल्व्हेशन आर्मी इव्हॅन्जलीन बूथ हॉस्पिटल आणि राजा अष्टविनायक गणपती मित्र मंडळ, ढवण वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात बूथ हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली. जनरल फिजिशियन डॉ. मीना फुके आणि त्वचारोग तज्ज्ञ डॉ. वृषाली महांडुळे यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. एकूण ६१ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रक्त तपासणीही मोफत करण्यात आली, तसेच आवश्यक औषधांचे वाटप केले.
बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर सुरेंद्र चोपडे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले की, तपासणीनंतर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमध्ये कमीत कमी खर्चात उपचार उपलब्ध करून दिले जातील. नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आजारांचे वेळेत निदान व उपचार करून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ऊर्जिता सोशल फाऊंडेशनच्या संध्या मेढे, सामाजिक कार्यकर्ते अनिल ढवण व प्रवीण साबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी विजय कसबे, आनंद नायडू, शोभा चव्हाण, आयडियल हेल्पिंग हँड नर्सेस आणि आरोग्य मित्र शरद कोंडा यांचे सहकार्य लाभले.