Headlines

दिव्य मराठी एक्स्पाेज:5 कोटींच्या नफ्यासाठी तेलंगणाचा घातक कचरा फेकतात महाराष्ट्रात, नांदेडमार्गे सिल्लोडला आणतात कचरा




कंपन्यांच्या घातक कचऱ्यावर शास्त्रीय प्रक्रिया करण्याऐवजी तेलंगणातील ‘व्हीबीआर ग्रीन एन्व्हायरो’ कंपनी महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. हा धक्कादायक प्रकार ‘दिव्य मराठी’च्या इन्व्हेस्टिगेशनमधून समोर आला आहे. पेंट, औषध निर्मितीनंतर 25 ते 30% घातक कचरा (हर्झाड्स वेस्ट) उरतो. तेलंगणातील ‘व्हीबीआर’ने प्रक्रिया करण्यासाठी हा कचरा संकलित केला. पण प्रक्रियेऐवजी दलालांमार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील गावांत उघड्यावर फेकला. याप्रकरणी 4 जुलैला सिल्लोड ग्रामीणमध्ये गुन्हा दाखल असून 12 आरोपी अटकेत आहेत. नियम काय सांगतो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) नियमानुसार अधिकृत केंद्रांमध्येच कचऱ्यावर उच्च तापमानाच्या भट्टीत विल्हेवाट लावणे बंधनकारक. यासाठी प्रत्येक उत्पादक कंपनीला प्रक्रिया केंद्रासोबत करारही करावा लागतो. कचऱ्याचा प्रकार आणि वजनानुसार कंपनी प्रक्रिया केंद्रांना मोठे शुल्कसुद्धा अदा करते. असे मोडतात नियम मात्र, या शुल्कातील तब्बल 75 ते 80% रक्कम केवळ प्रक्रियेसाठी लागणारी महागडी रसायने, यंत्रसामग्री, वीज बिल, वाहतूक आणि कुशल मनुष्यबळावर खर्च करावा लागतो. हाच खर्च टाळण्यासाठी ‘व्हीबीआर’ कंपनीचे संचालक चालबाजी करत महाराष्ट्रातील दलालांना पैसे देऊन सिल्लोडच्या संगारेड्डी जिल्ह्यातून घातक कचरा सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील पळशी, फर्दापूर, आळंद, शिऊर, तोंडापुरात मध्यरात्री आणून टाकतात. हे रॅकेट एक वर्षापासून सुरू आहे. वर्षभरात 100 ट्रकमधून फेकला 10 हजार ड्रम कचरा ट्रकला कमाई 15 हजार व्हीबीआरकडून एका ट्रकसाठी इस्तेकारला 75 हजार रुपये मिळतात. संगारेड्डी ते सिल्लोड प्रवास 40-45 हजार रुपयांत होतो. सिल्लोडच्या अब्दुल व इस्तेकारला प्रत्येकी 15 हजार रुपये नियमितपणे मिळायचे. आम्ही कंपन्यांचीही चौकशी करू ‘व्हीबीआर’ने कचरा जरी उघड्यावर टाकला तरी ज्या कंपन्यांतून तो निघाला त्याही तेवढ्याच जबाबदार आहेत. नियमाप्रमाणे त्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया केल्याची पोचपावती घेतली का, हे तपासण्यासाठी कंपन्यांची चौकशी करू. तत्पूर्वी सीपीसीबीच्या निर्देशांनुसार पोलिसांसमवेत एक समिती गठित केली जाईल. – अच्युत नांदवटे, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी या रॅकेटमध्ये 12 जणांचा समावेश ‘व्हीबीआर’ने इस्तेकारला कचरा दिला. हैदराबादची अल-यासीन ट्रान्सपोर्ट व संभाजीनगरच्या साऊथ गुजरात ट्रान्सपोर्टच्या ट्रकमधून सिल्लोडमध्ये आणला. याप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. – रवींद्र ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक, सिल्लोड ग्रमीण यात आमच्या कंपनीचा दोष नाही इस्तेकारने वीटभट्टीसाठी इंधन म्हणून हा कचरा नेला. तो त्याने उघड्यावर फेकल्याचे आम्हाला माहीत नाही. आमच्या कंपनीचा यात काही दोष नाही. उलट यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे. -वीरशेम भीमय्या खरचेला, संचालक, व्हीबीआर ग्रीन एन्व्हायरो ‘कचऱ्यात विषारी रसायने स्लजेस, स्पेंट सॉल्व्हेट्स, स्पेंट कॅटेलिस्ट, ईटीपी स्लजेस, खराब झालेले कंटेनर आणि लायनर्स, डिस्टिलेशन रेसिड्यू, तसेच एक्स्पायरी डेट झालेले किंवा क्वालिटी कंट्रोल चाचणीत फेल झालेल्या विषारी रासायनिक पदार्थांचा या कचऱ्यात समावेश असतो. पोलिसांना घटनास्थळी टीएचएफ (टेट्राहायड्रोफ्युरान), क्लोरोफॉर्म (ट्रायक्लोरोफॉर्ममिथेन) आणि टोल्युइन (मिथेलबेंझीन) यांसारखी अति धोकादायक रसायने आढळली. या रसायनांमुळे उलटी, मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे आणि श्वसनमार्गात जळजळ होण्याचा धोका संभवतो. ही रसायने जमिनीत झिरपल्याने भूजल दूषित होऊन शेती अन् पिण्याच्या पाण्याचेही नुकसान होते. एजंट कमावतो 70 लाख ‘व्हीबीआर’ एका ड्रमसाठी इस्तेकारला 700 रु. देते. एका ट्रकमध्ये 100 ड्रम येतात वर्षभरात 10,000 ड्रम फेकले तर प्रत्येक ड्रममागे 700 प्रमाणे 70-75 लाख रुपयांची कमाई. कंपनीची कमाई 4 कोटी 10,000 ड्रम कचऱ्यावर प्रक्रियेचा खर्च 5 कोटींपर्यंत. ‘व्हीबीआर’ने इस्तेकारला 75 लाख रुपये दिले. व्हीबीआर कंपनीने मात्र प्रक्रियेऐवजी 4.25 कोटी रुपये यातून वाचवले. संघटित अपराध हा केवळ पर्यावरणीय गुन्हा नाही. नागरी आरोग्य, शेती आणि जलस्रोतावर आघात करणारा संघटित अपराध आहे. आरोपींची गय करणार नाही. -प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *