Headlines

‘ब्लिंकिट’च्या साठ्यात अस्वच्छता;बुरशीयुक्त पदार्थ, परवाना निलंबित:वडगाव कोल्हाटीतील गोदामाची पाहणी; नोटिसीला उत्तर न दिल्याने कारवाई



शहरातील वाळूज परिसरातील साईनगर (वडगाव कोल्हाटी) येथील ‘मे. ब्लिंक कॉमर्स प्रा. लि.’ (ब्लिंकिट) या डिलिव्हरी पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने जनहिताच्या दृष्टीने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांनी १३

.

प्रशासनाला सहकार्य न केल्याने अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या कलम ३२ अंतर्गत सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी हा परवाना निलंबित केला. निलंबन कालावधीत अन्नपदार्थांची साठवणूक, विक्री किंवा डिलिव्हरी केल्यास कडक फौजदारी कारवाई होईल, असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.

अहवाल १४ दिवसांत

नमुन्यांचा प्रयोगशाळा अहवाल १४ दिवसांत येणे कायदेशीररीत्या बंधनकारक असते. नियमित नमुने घेतल्यास अहवाल येईपर्यंत व्यवसाय सुरू राहतो. मात्र, ब्लिंकिटच्या गोदामासारखी आरोग्याला धोका पोहोचवणारी अस्वच्छता व बुरशी आढळल्यास, अधिकारी १४ दिवसांच्या प्रयोगशाळा अहवालाची वाट न पाहता नागरिकांच्या सुरक्षेसाठी थेट परवाना निलंबित करून व्यवसाय बंद पाडतात.

तपासणीत काय?

  • गोदामात कोल्ड रूम्स आणि साठवणुकीच्या जागेत अस्वच्छता; खाद्यपदार्थ, पॅकेजिंग साहित्य व रसायने एकत्रच ठेवले होते.
  • खाद्यपदार्थांवर बुरशी आणि कीटकांचा प्रादुर्भाव; सर्व अन्नपदार्थ जमिनीवर आणि भिंतीला टेकवून अस्ताव्यस्त ठेवले गेले होते.
  • अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी नाही. तसेच काम करताना ॲप्रन, हातमोजे किंवा शिरोवस्त्राचा वापर नाही.
  • गोदामात पुरेशी प्रकाशयोजना, कचरा विल्हेवाटीची योग्य सोय आणि ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी यंत्रणा नव्हती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *