Headlines

जलप्रदूषण रोखण्यासाठी बाप्पाच्या मूर्तीचे कृत्रिम तळ्यात विसर्जन करा:लासलगावी ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन‎



ग्रामपंचायत हद्दीतील इरिगेशन कॉलनी, कॉलेजरोड, पाण्याच्या टाकीजवळ श्री गणेश विसर्जनासाठी यंदाही विशेष कृत्रिम तळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरातील नदी, पाट व जलस्रोतांचे पाणी पिण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी वापरले जाते. या जलस्रोतांचे पावित्र्य

.

गणेशोत्सवाच्या कालावधीत जमा होणारे निर्माल्य वाहत्या पाण्यात टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. यावर उपाय म्हणून प्रशासनाने कृत्रिम तळ्याशेजारीच निर्माल्य संकलनाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी श्री गणेशाचे विसर्जन कृत्रिम तळ्यात करून निर्माल्य ठरवून दिलेल्या जागेवर जमा करावे, तसेच या पर्यावरणपूरक उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासक राजेश थोरात व संजय बावीस्कर यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *