![]()
नगरपरिषद हद्दीत सन २०२६-२७ चा सार्वजनिक गणेशोत्सव आणि श्री गणेश विसर्जन सोहळा सुरक्षित, स्वच्छ व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विविध नागरी सुविधा आणि आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. सुरक्षित व पर्यावरणपूरक विसर्जन व्हाव
.
याशिवाय, शहरातील पारंपरिक रंगारी तलाव आणि खोकड तलाव या ठिकाणीही आवश्यक त्या नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य नदी किंवा तलावात न टाकता स्वतंत्रपणे जमा करावे, यासाठी स्वतंत्र ‘निर्माल्य कलश’ व संकलन केंद्र उभारण्यात येणार असून, तेथे नगरपरिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विसर्जन स्थळांवर आणि विसर्जन मार्गावर आवश्यकतेनुसार विद्युत व प्रकाश व्यवस्था केली जाणार असून, अंधाराच्या ठिकाणी अतिरिक्त फ्लड लाईट्स लावून चोख प्रकाश व्यवस्था ठेवली जाईल. धोकादायक विद्युत जोडण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. गर्दीच्या व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून परिस्थितीवर बारीक देखरेख ठेवली जाणार आहे. विसर्जन स्थळी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी बॅरिकेडिंग केले जाईल, तसेच आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन वाहन सज्ज ठेवले जाणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक व सूचना फलकही लावले जाणार आहेत.
विसर्जन सोहळा संपताच संपूर्ण परिसराची तातडीने स्वच्छता करून कृत्रिम तलावातील पाण्याची विल्हेवाट लावून मूर्तींचे नियमानुसार विसर्जन केले जाईल.
मिरवणुकीसाठी तीन मार्ग सोमवार पेठ मार्ग : सोमवार पेठ ते श्रीराम मंदिररोड, वरचे गाव, लोहार गल्ली, शिंपी गल्ली, नगरपरिषद कार्यालयमार्गे रंगारी तलाव. डावखरनगर मार्ग : डावखरनगर ते मनमाडरोड, चांदवड चौफुलीमार्गे रंगारी तलाव. वरचे गाव मार्ग : वरचे गाव ते नगरपरिषद कार्यालय, श्रीराम मंदिररोड, सोमवार पेठ, बाजारपेठ, गाडगेबाबा चौक, लेंडी हट्टीमार्गे रंगारी तलाव. या सर्व विसर्जन मार्गांवरील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, डागडुजी आणि साफसफाईची कामे तातडीने पूर्ण केली जाणार आहेत.