Headlines

सावित्रीबाई फुले शाळेच्या मैदानावर रंगली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा:160 मल्लांचा सहभाग; 50 विजेत्यांची जिल्हास्तरावर निवड‎




सावित्रीबाई फुले शिक्षण संस्था, उंडणगाव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेला उंडणगाव येथे प्रतिसाद मिळाला. सावित्रीबाई फुले शाळेच्या मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी सहभाग घेतला. या तालुकास्तरीय स्पर्धेत विविध शाळांतील तब्बल १६० विद्यार्थी मल्लांनी सहभाग नोंदवला होता. विविध वजनगटांत झालेल्या अटीतटीच्या लढतींमधून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ५० विजेत्या मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन पैलवान नारायण हिवाळे, पैलवान वसंता दांडगे, पैलवान देविदास सौंदर व पोलीस पैलवान संजय घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. समारोपप्रसंगी सिल्लोड पंचायत समितीच्या सभापती अनिताताई बनकर, जिल्हा परिषद सदस्य सचिन वाघ, गटशिक्षणाधिकारी राजेश महाजन आणि विस्तार अधिकारी राजू फुसे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुधीर महाजन, सचिव नारायणराव अहिरे, कोषाध्यक्ष नानाभाऊ सनांन्से, माजी सचिव ओंकार पाटील, खुशालराव शिनगारे, क्रीडा संयोजक कृष्णा धनवट, मुख्याध्यापक अनिल लांडगे यांच्यासह शिक्षक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय लांडगे व रोजेकर यांनी केले, तर मंगेश घुगे यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *