Headlines

भविष्यात सणउत्सव पूर्णपणे डीजेमुक्त पद्धतीने साजरे होतील- पोलिस प्रमुख, गणेशोत्सव उत्कृष्ट देखावा स्पर्धेच्या परीक्षणाचा प्रारंभ, नागरिकांची उपस्थिती‎




जिल्ह्याचा पोलीस अधिक्षक म्हणून पदभार घेतला त्याच वेळी विचार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेमुक्त सणउत्सव साजरे होण्याची मागणी केली होती. त्यावर पोलीस प्रशासनाने काम करून कडक नियम केल्याने आता मंडळाकडून चांगला प्रतिसाद मिळत असून कमी आवाजात मिरवणुका निघत आहेत. ही सुरवात असून भविष्यात याचा अधिक प्रभाव दिसणार असून पूर्णपणे डीजे मुक्त सणउत्सव साजरे होतील. सार्वजनिक उत्सव, जयंती पारंपरिक वाद्यांनी साजरे होतील आणि अहिल्यानगर ध्वनी प्रदूषण मुक्त होईल. गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम व जागृतीच्या विषयांवर देखावे सादर झाल्याने देशसेवेचा संदेश दिला जात आहे. यामुळे येणाऱ्या पिढीचे विचार बदलणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक सुदर्शन मुम्मका यांनी केले. विचार भारती आयोजित गणेशोत्सव उत्कृष्ट देखावा स्पर्धेच्या परीक्षणाचा प्रारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते भिंगारच्या दाणे गल्लीतील समर्थ युवा प्रतिष्ठानच्या देखाव्यास्थळी झाले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, भिंगार कँप पोलीस स्टेशनच्या निरिक्षक जयश्री थोरात, विचार भारतीचे अध्यक्ष सुधीर लांडगे, स्पर्धाप्रमुख रवींद्र बारस्कर, भिंगारचे समन्वयक किशोर कटोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ मुळे, छावणी परिषदेचे सदस्य वसंत राठोड यांच्यासह देखावा स्पर्धेचे परिक्षक, विविध मंडळांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. सुधीर लांडगे म्हणाले, गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने, संस्कृतीला अनुसरून व डीजेमुक्त व्हावा यासाठी विचार भारती अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. त्यास पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे आता काहीप्रमाणात यश येत आहे. भिंगारमध्ये अतिशय उत्कृष्टपणे गणेशोत्सव साजरा होत असून जनजागृती करणारे देखावे सादर झाले आहेत. तसेच विचार भारतीच्या गणेशोत्सव उत्कृष्ट देखावा स्पर्धेच्या मध्यनगर विभागाच्या परिक्षणाचा शुभारंभ पोलीस उपाधिक्षक दिलीप टिपरसे यांच्या हस्ते नवीपेठे येथे जय आनंद महावीर युवक मंडळ येथे झाले तर सावेडी विभागाचे उद्घाटन उद्योजक अमोल गाडे यांच्या हस्ते झाले. भिंगार येथे समर्थ युवा प्रतिष्ठानच्यावतीने मान्यवरांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष केतन गोवेकर व बबलू मुनोत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले. पारंपारिक पद्धतीने साजरा होतोय गणेशोत्सव गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने, संस्कृतीला अनुसरून व डीजेमुक्त व्हावा यासाठी विचार भारती अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. त्यास पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे आता काहीप्रमाणात यश येत आहे. यंदाही गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. मंडळांनी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *