Headlines

फडणवीसांचा दुष्काळ पाहणीचा दुसरा दिवस:आज अमरावती-वाशिममधील दुष्काळी स्थितीचा घेणार आढावा, बांधावर जाऊन पीकस्थिती पाहणार




राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि पावसाच्या प्रदीर्घ खंडाने उभी पिके करपून गेल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा थेट बांधावर उतरले आहेत. काल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर, मुख्यमंत्री आज विदर्भातील अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. लातूरमध्ये १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ बुधवारी मुख्यमंत्र्यांनी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा केला. लातूर जिल्ह्यातील ‘जाऊ’ गावात पिकांची आणि पाण्याची स्थिती पाहिल्यानंतर हा दुष्काळ १९७२ पेक्षाही भीषण असल्याची परिस्थिती समोर आली आहे. यावेळी आपल्या उद्ध्वस्त पिकांची अवस्था मुख्यमंत्र्यांना सांगताना शेतकऱ्यांना अक्षरशः रडू कोसळले. हतबल झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसत मुख्यमंत्र्यांनी त्यांना धीर दिला आणि “शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्व काही करू,” असा शब्द दिला. ३ दिवसांत दुष्काळाची अधिसूचना निघणार राज्यातील दुष्काळी स्थिती राज्य सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. “येत्या तीन दिवसांत दुष्काळाची पहिली अधिसूचना काढण्यात येईल,” अशी अत्यंत महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच, प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. रब्बी हंगामासाठी शक्य ती सर्व मदत केली जाईल आणि जोपर्यंत सर्वांना लाभ मिळत नाही, तोपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ‘निधी कमी पडू देणार नाही’ दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. “दुष्काळाबाबतचे सर्व अहवाल आम्ही गोळा केले असून त्यानुसार कारवाई सुरू आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीची तजवीज केली जात असून, सरकारकडे निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही,” असे फडणवीस म्हणाले. तसेच, मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरून त्यांनी महाविकास आघाडीवर (MVA) निशाणा साधला. मविआ सरकारने मराठवाडा वॉटर ग्रिड प्रकल्प गुंडाळल्याचा आरोप करत, आपले सरकार मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *