Headlines

पुणे शहरात विसर्जन सोहळ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल:उद्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्त्यासह अनेक मार्ग बंद




पुणे शहरात शुक्रवारी (25 सप्टेंबर) विसर्जन सोहळ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यंदाही विसर्जन सोहळ्यासाठी वर्तुळाकार वाहतूक योजना लागू केली जाणार आहे. विसर्जन सोहळ्यादरम्यान शहराच्या मध्य भागात मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विसर्जन सोहळ्याची सांगता होईपर्यंत हे बदल लागू राहतील. विसर्जन सोहळ्यानिमित्त बंद राहणाऱ्या रस्त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक), लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौकी ते टिळक चौक), बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक), गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक, हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक), गणेश रस्ता (दारूवाला पूल ते जिजामाता चौक) आणि केळकर रस्ता (बुधवार चौक ते टिळक चौक) यांचा समावेश आहे. याशिवाय, बाजीराव रस्ता (स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा ते फुटका बुरुज चौक), कुमठेकर रस्ता (टिळक चौक ते विश्रामबाग चौक), लालबहाद्दुर शास्त्री रस्ता (सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक), जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडोजी बाबा चौक), कर्वे रस्ता (नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक), नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार), भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना, नामदार गोखले चौक ते डेक्कन जिमखाना चौक), पुणे सातारा रस्ता (व्होल्गा चौक ते जेधे चौक), सोलापूर रस्ता (ढोले पाटील रस्ता ते जेधे चौक) आणि प्रभात रस्ता (डेक्कन टपाल कार्यालय ते शेलारमामा चौक) हे रस्तेही बंद राहतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *