Headlines

Navnath Ban Slams Sanjay Raut; Calls Him Kasab


छोटा शकील आणि शार्प शूटर कोण आहे हे सांगण्याच्या भानगडीत जनाब संजय राऊत यांनी पडू नये. ज्ञानेशकुमार जर छोटा शकील असतील तर संजय राऊत हे अजमल कसाब आहेत. कसाबने जसे सामन्य मुंबईकरांची हत्या केली तशीच लोकशाहीची हत्या संजय राऊत करत आहेत. संविधानाने दिलेल्

.

नवनाथ बन म्हणाले की, संविधानाने दिलेल्या संस्थावर आरोप करायचे आणि त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा, त्यांना बदनाम करत संविधानाची हत्या करण्याचे काम कसाब रुपी संजय राऊत करत आहेत. अमित शहा काय आहेत हे जनतेला माहिती आहे. ते चांगले काम करत असल्याने राऊतांच्या पोटात दुखत असेल. देवाभाऊ जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेत की निवडणूक आयोगामुळे हे जनतेला माहिती आहे. 2014, 2019 ला देवाभाऊंच्या मागे महाराष्ट्र होता. पण 2019 ला तुम्ही मतांवर दरोडा टाकला. उबाठामध्ये लोकशाही नाही ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या आदेश चालतो.

देवाभाऊंनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला

नवनाथ बन म्हणाले की, राज्यातील अनेक भागात दुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्वांचा आढावा देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठवाड्यात बांधावर जात घेतला आहे तर आज ते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. देवाभाऊंनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून दोन दिवसांमध्ये अध्यादेश जारी केला जाणार आहे. यामध्ये 21 जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केले जाईल.

देवाभाऊंना इव्हेंट करण्याची सवय नाही

नवनाथ बन म्हणाले की, देवाभाऊंना इव्हेंट करण्याची सवय नाही संजय राऊत यांना इव्हेंट करण्याची सवय लागली आहे. मविआचे सरकार आणि इव्हेंटबाज मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख निर्माण झाली होती. मातोश्रीच्या पलिकडे तुमचे सरकार गेले नाही. जे कधी बांधावर गेले नाही, ज्यांना ऊस जमीनीच्या वर येतो की खाली हे माहिती नाही, त्या संजय राऊत आणि त्यांच्या मालकांनी शेतकऱ्यांबद्दल बोलू नये. शेतकऱ्यांना फसवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केले होते. पण देवाभाऊ शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करत आहे.

हे ही वृत्त वाचा

ज्ञानेश कुमार गृहमंत्र्यांचे छोटा शकील:निवडणूक आयोगातून लोकशाहीची हत्या सुरू, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही- राऊत

ज्ञानेश कुमार हे केंद्रीय गृहमंत्र्यांचे छोटा शकील आहेत, मग इतरांना काय म्हणायचे ते तुम्ही ठरवा. पण अमित शहांच्या निवडणूक आयोगातील छोटा शकीलकडून लोकशाहीची हत्या करण्याचे काम सुरू आहे, त्यांना राजीनामा देत घरी जावे लागेल, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.