Headlines

पंढरपूरच्या रसिकांना कल्चरल शिदोरी, दान पावलंपासून अवघा रंग एक झाला:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या संगीत महोत्सवाची सुरेल सांगता‎



श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सोमवारी (दि. २१) ‘स्वरपंढरी’ या कार्यक्रमातून पंढरपूरमधील स्थानिक गुणवंत कलाकारांनी आपली गायनसेवा विठुरायाच्या चरणी समर्पित केली. या संगीत

.

प्रतिनिधी | पंढरपूर ‘दान पावलं’, ‘अवघा रंग एक झाला’, ‘दे रे कान्हा’, ‘अरे संसार संसार’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ आदी गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सहाही दिवस पंढरपूरकरांनी संगीत महोत्सवाला भरभरून प्रतिसाद देत सांस्कृतिक मेजवानीचा आनंद लुटला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आयोजित श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवाची सहाव्या दिवशी ‘स्वान आर्ट फाउंडेशन, सोलापूर’ प्रस्तुत ‘कल्चर शिदोरी’ या बहारदार कार्यक्रमाने सांगता झाली. प्रारंभी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव व मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी सहभागी कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुवर्णा शहाणे, उन्मेश शहाणे, अपूर्वा शहाणे, जतीन काजळे, किरण शहाणे, अद्वैत खेडकर, मंजुषा काजळे व रमेश कुलकर्णी यांनी विविध पिढ्यांच्या भावविश्वाला कलात्मक स्पर्श देत लोककला, अभंग, वासुदेव, भारूड, ओव्या, लावणी आणि गझल यांचा सुरेल नजराणा सादर केला. असे संगीत व सांस्कृतिक महोत्सव यापुढेही सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा रसिकांनी व्यक्त केली. मागील पाच-सहा दिवसांपासून पंढरपूरच्या रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळाली. महोत्सवात भाविकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ‘तू सुखकर्ता तू दुःखहर्ता’, ‘शोधीशी मानवा राऊळी मंदिरी’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘भाजे रे मुरलीच्या बाजे’, ‘सांज ए गोकुळी’, ‘टाळ बोले चिपळीला’ आणि ‘मेहंदीच्या पानावर’ आदी गीतांनी मैफिलीला रंगत आणली. ‘सजन नयन’ या सुरेल भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *