Headlines

महावितरणचा मोठा दणका!:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 80 वीजचोरांवर गुन्हे दाखल; 8 लाख 61 हजारांची वीजचोरी उघड




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्रास सुरू असलेल्या वीजचोरीविरोधात ‘महावितरण’ने आक्रमक पवित्रा घेतला असून एकाच वेळी धडक मोहीम राबवत तब्बल 80 वीजचोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरासह ग्रामीण भागात राबवलेल्या या मोहिमेमुळे अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महावितरणच्या विविध उपविभाग व शाखांच्या पथकांनी ही धडक कारवाई केली. यामध्ये थेट आकडे टाकून वीजचोरी करण्यापासून ते स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या ग्राहकांचा समावेश आहे. उपविभाग आणि शाखानिहाय झालेली कारवाई: 1. चिकलठाणा उपविभाग (विमानतळ शाखा): सहायक अभियंता प्रदीप मिसाळ आणि त्यांच्या पथकाने हिनानगर, सावित्रीनगर, चिकलठाणा, मोतीवाला कॉलनी, मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी, भारतनगर व मुकुंदनगर भागात तपासणी मोहीम राबवली. येथे स्मार्ट मीटर ऑटो डिस्कनेक्ट झालेल्या ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून परस्पर वीजपुरवठा पुन्हा जोडून घेतल्याचे उघडकीस आले. 12 ग्राहकांनी 5,041 युनिट वीजचोरी करून महावितरणचे 98,780 रुपयांचे नुकसान केले. यांच्यावर गुन्हे दाख या प्रकरणी सर्व आरोपींवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात तहेशीम खान मुसरत खान, सख्वाद्दिन शाम्सोद्दिन तांबोळी, सय्यद मोसिन सय्यद यासीन, मोहम्मद इसुफ मोहम्मद साईद, शहाजानबी दगदुबाई शेख, अरबाझ शेख शेरू, उज्वला दगडू साबळे, पी. इम्रान इमान आय्नुर शेख, इस्माईल ए रहमान शेख, आशालता बाबुराव रानाडे, राजू उत्तमराव चव्हाण, बकाल सांडू साळूबा यांचा समावेश आहे. 2. वाळूज महानगर (संभाजीनगर ग्रामीण शाखा): सहायक अभियंता शेख फेरोज व त्यांच्या सहकाऱ्यांनी वडगाव कोल्हाटी, गेवराई, गेवराई तांडा, गिरनेरा तांडा भागात धाडी टाकल्या. त्यात थेट तारांवर आकडे टाकून विजेचा वापर सुरू असताना ग्राहक रंगेहात पकडले गेले. 32 ग्राहकांनी 4,81,930 रुपयांची वीजचोरी केल्याचे समोर आले. यांच्यावर गुन्हे दाखल सोमीनाथ बाळासाहेब कोळेकर, कडू रामा कसबे, हरिभाऊ यमराज वैद्य, सतीश दत्तू ढाकणे, दादाराव ज्ञानोबा पांडे, नागेश्वर रामराव गटकाळ, विकी राजेश्वर मुळेवार, ईश्वर गणेश राठोड, राहुल मानसिंग राजपूत, संदीप मानसिंग राजपूत, निलेश सुभाष मोरे, नामदेव लक्ष्मण खांबड, दिलीप भानुदास पवार, शंकर गोविंद जाधव, सुरेश अंबरसिंग जाधव, संजय हिरालाल राठोड, पृथ्वीराज मानसिंग जाधव, कौतिक रामसिंग जाधव, नितेश पंढरिनाथ राठोड, संदीप भानुदास पवार, छाया विलास राठोड, जनार्धन भावसिंग राठोड, सुभाष प्रल्हाद पवार, अंकुश बबन राठोड, शांतीलाल उदाराम राठोड, रणजीत जयसिंग राठोड, अंकुश रामलाल पवार, कैलाश सोमनाथ पंडित, एकनाथ गोपीचंद राठोड, विजय दामोधर पंडित, विलास सोमनाथ पंडित व गोपीचंद भावसिंग पवार. 3. गदाना शाखा: कनिष्ठ अभियंता अविनाश कुंदे व पथकाने घोडेगाव, गोळेगाव, बोरवाडी, भडजी, शंकरपूरवाडी व रासलपुरा भागात कारवाई केली. 14 ग्राहकांनी वीजचोरी करून महावितरणचे 80,854 रुपयांचे नुकसान केले. यांच्यावर गुन्हे दाखल रवींद्र अंबादास रोकडे, कडूबा भीमराव चव्हाण, साईनाथ रामभाऊ जाधव, साहेबराव पुंजाजी जाधव, संतोष साहेबराव जाधव, बाबासाहेब आबाराव आवारे, साहेबराव महादू पोफळे, अप्पासाहेब सूर्यभान रोकडे, सुधाकर पद्माकर चव्हाण, मालनबाई यादव जाधव, भारत सोमीनाथ तुपे, वाल्मिक पुंजाबा वाकळे, कासम हबीब पठाण, बादशाह खुबान पठाण. 4. वारेगाव शाखा: कनिष्ठ अभियंता अमोल घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेलगाव, डोंगरगाव शिव, पिंपळगाव वळण, शिरोडी खुर्द, पिंपळगाव देव आणि वानेगाव परिसरात तपासणी केली. येथे 22 ग्राहकांनी वीजचोरी करत महावितरणचे 1,99,500 रुपयांचे नुकसान केल्याचे उघड झाले. यांच्यावर गुन्हे दाखल पंढरीनाथ माणिकराव देवकर, रंगनाथ सर्जेराव वाघदरे, गोविंद कोडीबा देवकर, दादासाहेब मिठू देवकर, नारायण रामराव मोरे, बजरंग साखरू जघाळे, रामधन मंसाराम जघाळे, राहुल तानाजी गढवे, नंदराम मगन जधाळे, पदमसिंग संकु जधाळे, बंडू बबन लगड, भगवान बाबुराव आहेर, भाऊसाहेब कचरू आहेर, परमेश्वर श्रीराम लगड, कडूबा केशव पाचुंदे, ओंकार अण्णासाहेब साळुंके, संजय विश्वनाथ काकडे, आजिनाथ माधवराव इथाते, सुधाकर पुंडलिक आहेर, बाबुराव एकनाथ लगड, तुकाराम पुंडलिक आहेर, चंद्रभान माणिकराव जाधव. शाखानिहाय झालेली वीजचोरी अशी: कारवाई तीव्र करण्याचे संकेत या धडक मोहिमेत पकडण्यात आलेल्या सर्व आरोपींवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये (सिडको पोलीस ठाणे आणि चिकलठाणा पोलीस ठाणे) भारतीय वीज कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणचे नुकसान करणाऱ्या आणि अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्यांविरोधात ही मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने राबवली जाईल, असा स्पष्ट इशारा महावितरण प्रशासनाने दिला आहे. तसेच ग्राहकांनी अधिकृत मार्गानेच वीज जोडणी घेऊन दंडात्मक व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *