Headlines

क्लासेस चालकांनी सीसीटीव्ही बसवावे:जामनेर येथील बैठकीत पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या संचालकांना सूचना‎




शहरातील खाजगी क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व क्लासेस चालकांनी आपापल्या परिसरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा स्पष्ट सूचना जामनेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी खाजगी क्लासेसच्या संचालकांना दिल्या आहेत. जामनेर शहरामध्ये विविध स्पर्धा परीक्षा व शालेय शिक्षणाचे अनेक खाजगी क्लासेस सुरू असून, येथे दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थ िनी येत असतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह परिसरातील संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवता यावे, यासाठी ही खबरदारी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. क्लासेसच्या मुख्य प्रवेशद्वारासह आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुस्थितीतील सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांची नियमित देखभाल करावी, तसेच आवश्यकतेनुसार सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, असे निर्देश बोराडे यांनी दिले. क्लासेस भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत टवाळखोर मुलांकडून विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्यास किंवा कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास चालकांनी व विद्यार्थ्यांनी न घाबरता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. टवाळखोरांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, जामनेर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी शहरातील कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर बडगा उगारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *