Headlines

अहिल्यानगर:मुळाच्या कालव्याचा भराव फुटला असता तर शेती गेली असती वाहून




मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असतानाच कालव्याचा भराव अचानक खचल्याने एकच धावपळ सुरू झाली होती. कालव्याच्या हेडला सुमारे १५०० क्युसेक पाणी असून चांदा भागात ११५० ते १२०० क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. कालवा दुथडी भरून वाहत होता. भरावाची उंची सुमारे ५० फूट आहे. हा भराव फुटला असता तर ओढे-नाले भरून शेती वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला असता. तसेच गावातही पाणी शिरण्याची शक्यता होती. मात्र, वेळीच पाणीपातळी कमी करून तातडीने उपाययोजना केल्याने मोठा धोका टळला. सध्या मशिन आणि डंपरच्या सहाय्याने भराव दुरुस्तीचे काम सुरू आहे. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी घटनास्थळी पाहणी केली. ते म्हणाले की, त्याठिकाणी गॅबीयन वॉलला मंजुरी आहे. काल योग चांगले होते, जर रात्री घटना घडली असती तर गंभीर स्थिती निर्माण झाली असती. सुदैवाने लवकर लक्षात आल्याने विघ्न टळले. त्यांनी कॅनल बंद केला. लायनिंग, गॅबीयन वॉलची कामे करायची आहे. पालकमंत्री सकारात्मक असून त्यांच्याशी बोलून हा विषय मार्गी लावला जाईल. दरम्यान, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे उपअभियंता एस. बी. पवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. आमदार विट्ठलराव लंघे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. हे उपाय केले तर सुटेल प्रश्न १) बॉक्स कल्व्हर्ट : आयताकृती काँक्रिटची संरचना करून त्यातून पाण्याचा प्रवाह नेण्याची पद्धत. अंदाजे खर्च ७० ते ८० कोटी रुपये. २) काँक्रिट लाइनिंग : कालव्याच्या तळाला आणि बाजूंना काँक्रिटचा थर देऊन मातीचा पाण्याशी थेट संपर्क कमी केला जातो. ३) गॅबियन संरचना : लोखंडी/स्टील वायरच्या जाळीच्या पिंजऱ्यात मोठे दगड भरून कालव्याच्या काठाला किंवा तळाला संरक्षण दिले जाते. अंदाजे खर्च २५ कोटी रुपये. मुळा विभागाने या उपाययोजनांचे पर्याय सुचवून त्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. यापैकी कोणती उपाययोजना करायची, याबाबत मुख्य अभियंता स्तरावर निर्णय प्रलंबित आहे. माती खळगट असल्याने भराव खचला ^ मुळा उजवा कालवा चांदा येथील ठिकाणी निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन पाणीपातळी कमी करण्यात आली आहे. धरणातूनही पाणी कमी केल्याने सध्या कालवा सुरक्षित आहे. संबंधित ठिकाणचे काम पूर्ण करून कालवा पूर्ववत करण्यात येईल. चांदा ते कौठा या भागात खळगट स्वरूपाची माती असल्याने ती खचण्याची शक्यता असते. त्यावर उपाययोजना म्हणून प्रायोगिक तत्त्वावर १०० मीटरचा पॅच करण्यात येणार आहे. याबाबत मुख्य अभियंत्यांकडे प्रस्तावही सादर केला आहे. – सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *