Headlines

Crops surviving severe drought rely on Jayakwadi water, planning to irrigate 1.83 lakh hectares through left and right canals



मराठवाड्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना प्रचंड फटका बसला आहे. ऐन गरजेच्या वेळी पावसाने दांडी मारल्याने अनेक भागांत पिके करपू लागली असून, शेतकरी आता रब्बी हंगामाकडे आशेने पाहत आहेत. अशा संकटमय परिस्थितीत जायकवाडी धरणातील पाण

.

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांचे वितरण जाळे मराठवाड्यातील मोठ्या भूभागाला पाणी पुरवते. डाव्या कालव्याची लांबी २०८ किलोमीटर असून, याद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. तर १३२ किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांतील ४१ हजार ६८२ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळते. अशा प्रकारे यंदा दोन्ही कालव्यांच्या माध्यमातून एकूण १ लाख ८३ हजार ३२२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. पावसातील प्रदीर्घ खंडामुळे हलक्या व मध्यम जमिनीवरील कापूस, सोयाबीन, मका आणि तूर या प्रमुख पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट निश्चित मानली जातआहे. या बिकट परिस्थितीत शेतकरी वर्ग

कालव्यांच्या दुरुस्तीचे, गळतीचे आव्हान दरम्यान, दोन्ही कालव्यांची दुरवस्था हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. दरवर्षी देखभाल-दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च होऊनही अनेक ठिकाणी कालव्यांची दुरवस्था झालेली दिसते. त्यामुळे धरणातून सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचताना होणारी गळती आणि पाण्याचा अपव्यय रोखणे हे जलसंपदा विभागासमोर मोठे आव्हान आहे. कालव्यांची तातडीने दुरुस्ती , वितरणाचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *