Headlines

संजय राऊतांकडून FDA कारवाईचे कौतुक:मात्र अधिकाऱ्यांवर वसुलीचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढेंकडे तातडीच्या चौकशीची मागणी




अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे राज्यभरात कौतुक होत असले, तरी या कारवाईच्या नावाखाली एफडीएचे अधिकारी हॉटेल आणि क्विक कॉमर्स व्यावसायिकांची लूट करत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी तुकाराम मुंढे यांना थेट पत्र लिहून अधिकाऱ्यांच्या ‘रेट कार्ड’ची पोलखोल केली असून, या पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवली आहे. ‘मुंढेंच्या दहशतीमुळे रेट कार्ड वाढले’ संजय राऊत यांनी पत्राच्या सुरुवातीला मे २०२६ पासून तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्न आणि अस्वच्छतेविरोधात उघडलेल्या मोहिमेचे स्वागत केले आहे. मात्र, या कारवाईची दुसरी बाजू धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, “एका बाजूला आपण कारवाईचा धडाका लावून व्यावसायिकांत दहशत निर्माण केली आहे. मात्र याचाच गैरफायदा एफडीएमधील पदनिर्देशित अधिकारी (DO) आणि अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) घेत आहेत. मुंढे हे कमिशनर होण्यापूर्वी ‘क्लोजिंग नोटिस’चा दर १०-१२ हजार होता. पण आता दहशत निर्माण झाल्याने हाच दर ७५ हजार ते २ लाखांवर गेला आहे.” बांद्रा मुख्यालय आणि ठाणे कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लुटीचा मुख्य अड्डा असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. कायद्याचा गैरवापर आणि १७ लाखांची वसुली एफडीएच्या अधिकाऱ्यांना कायदा समजलेला नाही, असे सांगत राऊत यांनी कारवाईच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार (तपासणी, नोटीस, सुनावणी) कारवाई न करता केवळ उंदीर, झुरळे दिसल्याचे कारण देऊन थेट परवाना निलंबनाची भीती दाखवून खंडणी वसूल केली जात आहे. “ठाण्यातील एका ‘डीओ’ जोडीने क्विक कॉमर्स कंपनीकडून निलंबित परवाना परत मिळवण्यासाठी तब्बल १७-१८ लाख रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. अनेक कारवाया या केवळ ‘ग्राहक तक्रारी’वरून होतात, ज्यांची सत्यता तपासली जात नाही,” असे राऊत यांनी नमूद केले. फार्मा लॉबीला अभय का? अन्न आणि खाद्य उद्योग विखुरलेला असल्याने त्यांना ‘टार्गेट’ करणे सोपे जाते, मात्र फार्मा क्षेत्रात गंभीर त्रुटी असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. “फार्मा कंपन्या सत्ताधारी पक्षांना हजारो कोटींच्या देणग्या देतात, त्यामुळे त्यांना ‘वर’चा वरदहस्त आहे. लहान उद्योगांवर हल्ला आणि मजबूत लॉबीकडे कानाडोळा हा आरोप फेटाळून लावण्यासाठी तुम्हाला समान कठोरता दाखवावी लागेल,” असे राऊत यांनी पत्रात बजावले आहे. ‘मुंढे इफेक्ट कार्यालयातही दिसू द्या’ पत्राच्या शेवटी संजय राऊत यांनी तुकाराम मुंढेंना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. “जनतेचे आरोग्य महत्त्वाचे आहे, पण आरोग्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी वसुली केली तर ती लूट आहे. ‘मुंढे इफेक्ट’ फक्त हॉटेलच्या किचनमध्ये नाही, तर एफडीएच्या कार्यालयात तिसऱ्या मजल्यावरही दिसणे गरजेचे आहे,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे. आता या खळबळजनक पत्रावर तुकाराम मुंढे आणि राज्य सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संजय राऊतांचे पत्र..
हेही वाचा.. बँकांचा आजपासूनचा 3 दिवसांचा संप टळला:कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर उच्चस्तरीय समिती स्थापन होणार; संपामुळे बँका रविवारीही सुरू होत्या बँकांमध्ये 5 दिवसांच्या कामकाजाच्या मागणीसाठी आजपासून होणारा तीन दिवसांचा बँक संप पुढे ढकलण्यात आला आहे. म्हणजेच 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी होणारा तीन दिवसांचा देशव्यापी संप सध्या होणार नाही. इंडियन बँक असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत सुट्टीच्या मागणीसंदर्भात समिती स्थापन करण्यावर सहमती झाली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *