![]()
गणेशोत्सव आटोपला. या गणेशोत्सवात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कचरा उत्पन्न होत असतानाही शहराची स्वच्छता, घराघरातून कचऱ्याचे संकलन बंद राहिले. त्यामुळे नागरिकांच्या घरात कचरा साचला असून डस्टबिन भरल्यामुळे पोत्यांमध्ये कचरा साठवण्याची वेळ आली आहे. कारण, घंट
.
निवडणुकीपासून गळ्यात गळा घालून फिरणारे सत्ताधारी आणि विरोधक आता आपापल्या भूमिकेत परत आले आहेत. विरोधकांनी शहराच्या अस्वच्छतेसाठी जनप्रतिनिधींसह सत्तापक्षाला जबाबदार ठरवले आहे. शहरात अस्वच्छतेमुळे जर महामारी आली तर त्यासाठी ते जबाबदार राहतील, असा आरोप केला आहे. त्याचवेळी सत्तापक्षाने मनपा प्रशासनाला तत्काळ स्वच्छतेचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी जबाबदार स्वच्छता कंत्राटदाराला दंड करून कामाला लावा. त्याचे बिल रोखा. असे निर्देश दिले आहेत. सोबतच विरोधी पक्षाने केलेले आरोप खोडून काढत, आम्ही हातावर हात ठेवून बसलो नाही. स्वच्छतेचे काम सुरू करण्याचे सातत्याने प्रयत्न करीत आहोत, असे म्हटले आहे. काहीही असले तरी शहरवासी ऐन उत्सवाच्या काळात स्वच्छ शहराला मुकले आहेत. यासाठी सत्तापक्षासह विरोधक, मनपा प्रशासन, जनप्रतिनिधी आणि स्वच्छता कंत्राटदार कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि. जबाबदार आहे.
अस्वच्छतेमुळे विरोधक, सत्तापक्षात आरोप-प्रत्यारोप सहा दिवसांत शहरात अस्वच्छता पसरल्याने कचऱ्यात अळ्या पडत आहेत. त्यामुळे महामारीचा धोका निर्माण झाला आहे. मनपाच्या स्थापनेपासून आजवर अशा प्रकारे स्वच्छतेबाबत आणिबाणीची, वाईट स्थिती कधी निर्माण झाली नव्हती. एका विशेष प्रभागातच स्वच्छतेचे काम सुरू आहे. यासाठी मनपातील सत्तापक्ष, जनप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले व माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी केला. त्याचवेळी सत्तापक्षाने सांगितले, त्यांच्या विरोधात दंड करण्यासह स्वच्छतेचे काम सुरू करण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले आहेत. महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेते चेतन गावंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले.
कोणार्कने त्यांची १०० कचरा संकलित करणारी वाहने चोरीला गेल्याची तक्रार काही दिवसांआधी राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, त्यांच्याकडे या वाहनांची कागदपत्रेच नसल्यामुळे ती त्यांच्या मालकीची नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. चोरांच्या उलट्या बोंबा यानुसार कोणार्कने स्थानिक स्वच्छता कंत्राटदारांकडून वाहने घेतली. मात्र, स्थानिक कंत्राटदारांसोबत बिनसल्यामुळे ज्यांची ही वाहने होती, त्यांनी ती परत घेतली. आता शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कोणार्ककडे वाहनेच नाहीत. मग घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे त्यांना कसे शक्य होणार आहे.