![]()
अमरावती येथे काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फीची मागणी केली. मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळल्याचा आरोप करत ग्रामीण व शहर काँग्रेसने जिल्हाकचेरीवर धरणे आंदोलन केले. खासदार बळवंतराव वानखडे यांनी नेतृत्व केले. काँग्रेसच्या मते, निवडणूक आयोगाने निष्पक्ष काम करणे अपेक्षित आहे. पण, एसआयआर प्रक्रियेद्वारे मतदारांची नावे मोठ्या संख्येने वगळली जात आहेत. दोन आयुक्तांनी मुख्य आयुक्तांच्या निर्णयांवर आक्षेप घेतल्याचा संदर्भही निवेदनात दिला. काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत लोकशाही रक्षणासाठी कारवाईची मागणी केली. महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमधील मतदार यादी प्रक्रियेबाबतही निवेदनात आरोप आहेत. आंदोलनात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री यशोमती ठाकुर, डॉ. सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी “वोट चोरी त्वरित थांबवा”, “ज्ञानेश कुमार राजीनामा द्या” अशा घोषणा दिल्या.
Source link
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची काँग्रेसची मागणी:मतदार यादीतून नावे वगळल्याचा आरोप करत अमरावतीत जिल्हाकचेरीवर धरणे आंदोलन