![]()
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ मिळावा, या मागणीसाठी अमरावतीत गुरुदेवभक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सोमवारी जिल्हाभरातील अनेक गुरुदेवभक्त यात सहभागी झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळा समितीने महारॅली काढली. ती संत गाडगे महाराज समाधीस्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले. ग्रामगीताचार्य मनोहराव साबळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. तुकडोजी महाराजांनी ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे…’ असा संदेश दिला. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भजनांनी क्रांतीची मशाल पेटवली, ग्रामसुधारणेची गंगोत्री घराघरात पोहोचवली. ते राष्ट्राचे आराध्य दैवत मानले जातात. २१ ऑक्टोबरपासून गुरुकुंज मोझरी येथील समाधीस्थळ परिसरात जनआंदोलन होईल. यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी तिवसा तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनही झाले होते. हे आंदोलन राज्यभर पसरत आहे.
Source link
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या:अमरावतीत गुरुदेवभक्तांचे कलेक्ट्रेटवर धरणे; 21 ऑक्टोबरपासून मोझरीत पुन्हा आंदोलन