![]()
राज्याची भाग्यरेषा ठरत असलेल्या समृद्धी महामार्गाला प्रवाशांचा आणि वाहनधारकांचा चांगला मिळत आहे. डिसेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत या महामार्गावरून तब्बल ४ कोटी ३७ लाख ७० हजार ३९० वाहनांनी प्रवास केला आहे. विशेषत: एकट्या छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचे प्रमाण ६० टक्के आहे. या महामार्गावरील वाढत्या वाहतुकीतून राज्य शासनाच्या तिजोरीत तब्बल ३,२२२ कोटी ६२ लाख ८९ हजार ९२७ रुपयांचा विक्रमी टोल महसूल जमा झाला आहे. विशेष म्हणजे दिवसाला ३२ हजार वाहने धावण्याचे उद्दिष्ट महामार्ग एमएसआरडीसीचे होते. मात्र सद्य:स्थितीत ५३ हजारांहून अधिक वाहने धावत असल्याची माहिती समोर येत आहे. तेव्हा समृद्धी महामार्गाचा वेग सुसाट झाला आहे. गेल्या साडेतीन वर्षांचा आलेख पाहता, दरवर्षी ‘समृद्धी’वरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, भविष्यात हा आकडा अधिक गतीने वाढण्याची शक्यता आहे. चार वर्षांतील वाहतूक आणि टोल महसूल
वर्ष एकूण वाहतूक एकूण महसूल
२०२२-२३ १४,३४,५४५ १०६,४१,५०,९८३
२०२३-२४ ७२,५४,११६ ५२८,१०,९८,७५७
२०२४-२५ १,०५,१३,८३४ ७४०,६२,८२,८३९
२०२५-२६ १,६५,१९,०१५ १,२५७,७३,०८,१४९
एकूण ४,३७,७०,३९० ३,२२२,६२,८९,९२७ वाहतूक व महसुलात ११ पटींनी वाढ समृद्धीवरील वाहनांच्या संख्येत आणि टोलच्या महसुलात मागील ४ वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. सुरुवातीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२५-२६ मध्ये वाहनांची संख्या सुमारे ११.५ पटींनी, तर टोलची कमाई ११.८ पटींनी वाढली आहे. संभाजीनगर ते मुंबईचा प्रवास सर्वाधिक या महामार्गाचा सर्वाधिक फायदा मराठवाडा व विशेषतः छत्रपती संभाजीनगरला होत आहे. प्राप्त माहितीनुसार, समृद्धीवरील वाहनांपैकी तब्बल ६० टक्के वाहने केवळ संभाजीनगर ते मुंबई यादरम्यान धावतात. मराठवाड्याची राजधानी ते राज्याची राजधानी हा प्रवास अत्यंत वेगवान, सोयीचा झाला असून, बहुतांश व्यावसायिक व नागरिक याच मार्गाला पसंती देत आहेत.
Source link
‘समृद्धी’मार्गे मुंबईला जाणाऱ्या वाहनांत संभाजीनगरातील वाहनांचे प्रमाण 60%:4.37 कोटी वाहने, टोलमधून 3,222 कोटींचा महसूल