Headlines

पती, दोन मुलांच्या मृत्यूनंतर‎ शिक्षिकेने केली आत्महत्या‎:नांदेडला दोन दिवसांपूर्वी गळफास घेण्याचा प्रयत्न‎




पती आणि दोन मुलांच्या मृत्यूच्या ‎‎‎घटनेनंतर ‎‎मानसिक धक्का ‎‎‎बसलेल्या ‎‎शिक्षिकेने राहत्या ‎‎‎घरी २६‎‎सप्टेंबरला‎‎ गळफास घेऊन ‎‎‎आत्महत्या ‎‎करण्याचा प्रयत्न‎ केला. या घटनेनंतर गंभीर जखमी‎ झालेल्या शिक्षिकेवर नांदेडमध्ये‎ उपचार सुरु होते. सोमवारी‎ उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.‎ ही घटना नांदेड शहरातील सांगवी ‎भागातील गोपाळनगर येथे घडली.‎ध म्मशिला मोरे असे मृत‎ शिक्षिकेचे नाव आहे.‎ भोकर तालुक्यातील बेंबर‎ येथील मूळ रहिवासी असलेले ‎सुनील मोरे हे जिल्हा परिषद‎ शाळेत शिक्षक होते. त्यांच्या पत्नी‎ धम्मशिला मोरे या देखील शिक्षिका ‎होत्या. सुनील मोरे यांनी १७‎ जुलैला मुलगी सारा आणि मुल गा‎सुमित यांच्यासह कार गोदावरी‎ नदीपात्रात घालून आत्महत्या केली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ होती. या प्रकरणाच्या तपासात‎ त्यांनी दोन्ही मुलांची हत्या ‎केल्यानंतर आत्महत्या केल्याचे ‎पोलिस तपासात समोर आले होते.‎ पती आणि दोन्ही मुलांच्या‎ मृत्यूनंतर शिक्षिका धम्मशीला मोरे‎ यांना मोठा मानसिक धक्का‎ बसला होता. या धक्क्यातून त्या‎ सावरल्या नव्हत्या. २६ सप्टेंबरला‎ दुपारी एकच्या सुमारास त्यांनी‎ गोपाळनगर येथील राहत्या ‎फ्लॅटमध्ये गळफास घेण्याचा‎ प्रयत्न केला होता. त्यांना‎ उपचारासाठी रुग्णालयात दाखल ‎करण्यात आले होते. मात्र,‎उपचारादरम्यान २८ सप्टेंबर रोजी‎ त्यांचा मृत्यू झाला. पती आणि दोन ‎मुलांच्या मृत्यूनंतर धम्मशीला‎ यांचाही मृत्यू झाला.‎ 3 महिन्यांत कुटुंबच संपले‎ १७ जुलैला धम्मशीला मोरे यांच्या ‎पतीने दोन्ही मुलांसह कार गोदावरी‎ नदीच्या पुलावरून थेट नदीपात्रात‎ घालून आत्महत्या केली होती.‎त्यानंतर कुटुंबात एकट्यात उरलेल्या ‎धम्मशीला मोरे यांनी देखील जीवन‎ संपवले. त्यामुळे तीन महिन्यांच्या ‎काळात संपूर्ण कुटुंबच संपले आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *