Headlines

शेतकऱ्याला प्रत्यक्षात काय मि‌ळाले, विचारत शिवसैनिक जिल्हा कचेरीत:खासदार सावंत, आमदार देशमुख यांच्या नेतृत्वात मोर्चा‎




राज्य सरकारने जिल्ह्यातील सर्व चौदाही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काय मिळाले, असे विचारत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी २८ सप्टेंबर रोजी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. खासदार अरविंद सावंत आणि आमदार नितीन देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मोर्चाच्या शेवटी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यात एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. कोणतेही निकष आडवे न आणता सरसकट दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची पोकळ घोषणा करुन चालणार नाही, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना रोख मदत मिळाली पाहिजे, असे सावंत यांनी यावेळी बजावून सांगितले.मोर्चात माजी खासदार अनंत गुढे, विभागीय संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख पराग गुडधे, शहरप्रमुख प्रवीण हरमकर, माजी नगरसेवक प्रदीप बाजड व पंजाबराव तायवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या रुपात शिवसैनिक सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाकचेरीवर पोहोचण्यापूर्वीच काही अंतरावर अडविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी एका प्रतिनिधीमंडळाला जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी चला, अशी सूचना केली. किती जणांनी जावे, यावर एकमत न झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी बॅरिकेट तोडून जिल्हाकचेरीकडे धाव घेतली. शेवटी जिल्हाकचेरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सर्वांना अडवण्यात आले. झटापटीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. अशोक सोनारकर, राज्य सचिव, अ.भा. किसान सभा. जिल्हाकचेरीजवळ बॅरिकेट तोडले, पोलिस जखमी दुष्काळाच्या नावाखाली भूलभुलय्याचा खेळ सुरु तीन ट्रिगरचे अहवाल पुढे आल्यानंतर अंतिमत: चित्र स्पष्ट होणार असल्याचे कृषी खात्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे त्या तीन निकषांमध्ये नेमकी काय स्थिती असेल, हे पुढच्या महिन्यात कळेल. एकंदरीत दुष्काळाच्या नावाखाली भूलभुलय्या सुरु आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *