![]()
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषण करून महायुती सरकारला अनेकदा जेरीस आणणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सपूर्वी 29 ऑगस्ट रोजी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. ते मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर प्रकृती खालावल्याने 20 व्या दिवशी बीडमधील पाटोदा येथे त्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, या आंदोलनानंतर जरांगे यांचे सहकारी एकामागून एक अडचणीत सापडत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी जरांगे यांच्या काही सहकाऱ्यांची आयकर खात्याने चौकशी सुरू केली होती. त्यानंतर, जरांगे यांच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय कटारे यांना अवैध वाळू उत्खनन प्रकरणात कारवाईचा सामना करावा लागला. या घडामोडी ताज्या असतानाच, आता एकेकाळी मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनीच जरांगे यांच्या समर्थकांवविरोधात थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. कोणाला पॅकेज आले चौकशी करा ललिता तारख म्हणाल्या की,काही जणांकडून सोशल मिडीयावर शिवीगाळ अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून बदनामी करण्यात येत आहे, लोकं काहीही कमेंट करत आहेत या संदर्भात मी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या कमेंट करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंना विनंती आहे की जे लोकं माझी बदनामी करत आहेत की मी पैसे कमावले त्यांची तुम्ही सखोल चौकशी करा. 2023 पासून कोणाला किती पैसे आले पॅकेज मिळाले, याची चौकशी केली पाहिजे. बोलताना भान ठेवा ललिता तारख म्हणाल्या की, मी अंबड पोलिस ठाण्यात आले होते. एवढे दिवस मी त्यांच्या बाजूने बोलत होते, तेव्हा ते त्यांना चांगले वाटायचे; पण आज सत्य बोलले तर त्यांचे धाबे दणाणले आहेत. तुम्ही सोशल मीडियावर ज्या पद्धतीने कॉमेंट्स करत आहात, किमान तुमच्या घरीही आई-बहीण आहे, याचे भान ठेवा. तुम्ही कसे उपोषण केले हे मी वेळ आल्यावर सांगेन ललिता तारख म्हणाल्या की, अंतरवाली सराटीमध्ये एकही कुणबी नोंद सापडलेली नाहीये, मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटीयरनुसार आरक्षण भेटेल असे आश्वासन आम्हाला दिले होते. यापूर्वी आम्ही मंडप काढू नये म्हणून पोलिसांना विरोध केला होता. उपोषण केल्यावर माणूस दोन दिवस देखील राहू शकत नाही. तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार आहे, तुम्ही कसे उपोषण केले हे मी वेळ आल्यावर सांगेन, उपोषण स्थळावरून शिव्या देणे योग्य नाही, छत्रपती शिवराय 18 पगड जातींना घेऊन चालणारे होते, जिल्हाधिकाऱ्यांबद्दल जी भाषा वापरली गेली, ती योग्य नव्हती, असेही त्यांनी म्हटले आहे. हे ही वृत्त वाचा
Source link
मराठा आंदोलनातील वाद चव्हाट्यावर:कोणाला किती पॅकेज मिळाले, 2023 पासून चौकशी करा, जरांगे समर्थकांविरोधात ललिता तारख आक्रमक पवित्रा