Headlines

मालेगावमध्ये शिक्षकाच्या मृत्यूनंतर अधिकाऱ्यांवर एफआयआर:एफआयआर रद्द करण्यासाठी सामूहिक रजा, मुंबईत बेमुदत धरणे आंदोलन सुरू




मालेगाव येथील शाळेच्या तपासणीदरम्यान शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर तपासणी पथकातील अधिकाऱ्यांसह शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल झाला. हा एफआयआर रद्द करण्यासाठी अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने मुंबईतील आझाद मैदानावर सामूहिक रजा आणि बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यापूर्वी १६ ते १८ सप्टेंबर रोजी ‘लेखणी बंद’ आंदोलन झाले होते, पण शासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. शासकीय कर्तव्य बजावताना अधिकाऱ्यांनी त्रास दिला नसताना, अचानक घडलेल्या घटनेचा संबंध जोडून गुन्हे नोंदवणे अन्यायकारक असल्याचा संघटनेचा आरोप आहे. यामुळे अधिकाऱ्यांचे मनोबल आणि दैनंदिन कामकाजावर वाईट परिणाम होत आहे. संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सहा प्रमुख मागण्या मांडल्या आहेत: मालेगाव प्रकरणातील गुन्हे रद्द करणे, अटकेपासून संरक्षण, विभागाच्या परवानगीशिवाय अटक न करण्याचे गृह विभागाला निर्देश, ‘मॅट’ आदेशानुसार पात्र सहसंचालकांना संचालक पदाचा भार, निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणे, पदस्थापनेच्या वाट पाहत असलेल्यांना त्वरित नेमणूक आणि कर्तव्य बजावताना त्रुटी आढळल्यास आधी विभागीय चौकशी करणे. हे आंदोलन संघटनेचे अध्यक्ष शेषराव बढे, कार्याध्यक्ष रवींद्र वाणी, सरचिटणीस सरोज जगताप, कोषाध्यक्ष डॉ. ज्योती परिहार आणि कार्यालयीन सचिव समरजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *