![]()
विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघावरील भाजपचा दावा आता संपुष्टात आला आहे. महायुतीत हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे जाईल, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांनी मंगळवारी सांगितले. दुसरीकडे, शिवसेनेने अद्याप या मतदारसंघात कुणाला पाठिंबा द्यायचा हे स्पष्ट केले नाही. गेल्या सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले आमदार किरण सरनाईक आणि मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले प्रा. श्रीकांत देशपांडे या दोघांनीही आपली उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही उमेदवारांनी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या पाठिंब्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या एक-दोन दिवसांत घोषित करतील, असे ते म्हणाले. प्रा. देशपांडे यांनी मागील निवडणूक शिवसेनेच्या पाठिंब्याने लढवली होती, तर किरण सरनाईक २०२० मध्ये अपक्ष म्हणून लढले होते. त्यामुळे शिवसेना पारंपरिक शिवसैनिक प्रा. देशपांडे यांना की नव्याने पक्षात आलेल्या किरण सरनाईक यांना पाठिंबा देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Source link
अमरावती शिक्षक मतदारसंघ शिंदेसेनेला, भाजपचा दावा संपुष्टात:महायुतीत निर्णय; दोन उमेदवारांनी केली दावेदारी, शिंदे घेणार अंतिम निर्णय