Headlines

लालबागचा राजा चरणस्पर्श पेटीत 3.53 कोटींचे दान:दानाचे सर्व विक्रम यंदा मोडीत, 2024 मध्ये मिळाले हाेते 3.18 कोटींचे दान


यंदा देश-विदेशातील भाविकांकडून 6.11 कोटींची रोकड अर्पण

मुंबईचे आराध्य दैवत आणि ‘नवसाला पावणारा’ अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी यंदा भक्तीचा अक्षरशः महापूर पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, नुसते लांबून मुखदर्शन घेण्यापेक्षा राजाच्या चरणांवर डोके ठेवून नतमस्तक होणाऱ्या भाविकांनी भरभरून दान दिल्य

.

गेल्या दोन वर्षांचे दानाचे सर्व विक्रम यंदा मोडीत निघाले आहेत. १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत चाललेल्या गणेशोत्सवात भाविकांनी राजावर श्रद्धेने धनाचा वर्षाव केला. रोख रकमेत मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ३३ लाख ४६ हजार ५०० रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली .

तीन वर्षांतील दानाचा चढता आलेख

आज सोन्या-चांदीसह दोन बाइक्सचा जाहीर लिलाव

देश-विदेशातील भाविकांनी लालबागच्या राजाला रोख रकमेसोबतच सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि दोन दुचाकी अर्पण केल्या आहेत. या सर्व वस्तूंचा जाहीर लिलाव बुधवारी होणार आहे.

नवसाचा गणपती पडले नाव

लालबागच्या राजाची मूर्ती १९३५ सालापासून म्हणजेच गेल्या अनेक दशकांपासून ‘कांबळी आर्ट‌्स’चे कांबळी कुटुंबीयच घडवत आहेत. शिवाय, १९३४ मध्ये स्थानिक कोळी आणि व्यापाऱ्यांनी पेरू चाळीतील बाजार बंद पडू नये म्हणून नवस केला होता. तो पूर्ण झाल्याने त्यांनी हा गणपती बसवला, तेव्हापासूनच तो ‘नवसाचा गणपती’ म्हणून जगभरात प्रसिद्ध झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *